शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरही विधानसभा प्रचाराची राळ

By admin | Updated: October 8, 2014 00:51 IST

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सोशल मिडीयाचे कट्टे राजकारणाच्या वाद-प्रतिवादाने गजबजून गेले आहेत.

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सोशल मिडीयाचे कट्टे राजकारणाच्या वाद-प्रतिवादाने गजबजून गेले आहेत. जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांनी सोशल मिडीयावरील प्रचारासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केल्याने सध्या या आॅनलाईन माध्यमावर प्रचाराची धामधूम सुरु आहे. स्मार्ट फोनच्या वाढत्या संख्येबरोबर सोशल मिडीयावरील माध्यमांची संख्याही वाढली आहे. पूर्वी केवळ फेसबुकवर सर्वांची मदार होती. आता फेसबुकबरोबरच व्हॉट्सअ‍ॅप तसेच हाईक आणि इतर व्यासपीठेही तरुणाईसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळेच रस्त्यावरील प्रचाराऐवजी या आॅनलाईन प्रचारावर बहुतांश उमेदवारांनी भर दिल्याचे चित्र आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने वापर केला होता. त्यामुळे इतर पक्षही सजग झाले. मागील काही महिन्यापासूनच बहुतांश उमेदवारांनी सोशल मिडीयाच्या प्रचाराची मोर्चेबांधणी केली होती. या अनुषंगाने प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी थेट वॉररुमही उभारल्या आहेत. तेथे संगणकात प्रशिक्षीत असलेल्या तरुणांच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराची प्रतिमा उजळ करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात आहेत. याबरोबरच विरोधकांच्या टिका टिप्पणीला सडेतोड उत्तरेही दिली जात आहेत. त्यामुळेच तरुणांचे फोन सध्या मेसेजच्या रिंगटोनने खणखणत आहेत. विशेष म्हणजे राज्य स्तरावरील अनेक महत्वाच्या मुद्यावर व्हॉट्सअ‍ॅप तसेच फेसबुक ग्रुपवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. टी.व्ही.वरील जाहिरातींचा समाचारसोशल मिडीयाप्रमाणेच टी.व्ही.वरील विविध वाहिन्यांवर सध्या सर्वच प्रमुख पक्षात जाहिरात युद्ध सुरु आहे. कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र याबरोबरच माझे नाव शिवसेना आणि काँग्रेसमुळेच महाराष्ट्र पहिला आदी जाहिरातींची यावेळी सर्वसामान्यातही चर्चा आहे. विशेष म्हणजे विविध खाजगी वाहिन्यांवरील या जाहिरातींची खिल्ली उडविण्याबरोबरच विरोधी उमेदवारांच्या जाहिराती कशा चुकीच्या आहेत हे सोशल मिडीयावरुन दाखवून दिले जात आहे. जाहिरातींना प्रतिउत्तर देत विरोधकांच्या जाहिरातींची हवा काढून घेण्याचा प्रयत्नही सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोरात सुरु आहे. (प्रतिनिधी)