शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पितृतुल्य मुंडेंसाठी नेतेही लेकरांसारखे रडले..!

By admin | Updated: June 5, 2014 00:47 IST

दत्ता थोरे, लातूर केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे पार्थिव लातूरच्या विमानतळावर आले आणि जिल्ह्यातील भाजपाचे पोलादी नेतेही लेकरांसारखे रडले.

दत्ता थोरे, लातूर केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे पार्थिव लातूरच्या विमानतळावर आले आणि जिल्ह्यातील भाजपाचे पोलादी नेतेही लेकरांसारखे रडले. पार्थिव दर्शनासाठी ठेवल्यानंतर मंचावर प्रज्ञाताई आणि पंकजाताई जेव्हा रडू लागल्या तेव्हा तर जिल्ह्यातील नेते हमसून हमसून रडत होते. माजी आ. गोविंद केंद्रे यांनी तिरंग्याने लपेटलेल्या पार्थिवावर डोके ठेवून टाहो फोडला तेव्हा जणू उपस्थितांच्या काळजालाच हात घातला. आणि सर्वात विशेष म्हणजे फक्त भाजपाच नव्हे तर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपाइं अशा सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दिवसभर हजेरी लावली. लातूरच्या विमानतळाला आज सर्वपक्षीय नेत्यांनी अश्रुंचा अभिषेक घातला. त्यातल्या त्यात भाजपा नेत्यांना आपल्या अश्रुंना रोखता आले नाही. पार्थिव आल्यानंतर रमेशअप्पा कराड, खा. डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आ. संभाजीराव निलंगेकर हे लहान लेकरे रडावीत तसे हमसून हमसून रडत होते. प्रज्ञाताई आणि पंकजातार्इंना शेजारी-शेजारी रडताना पाहून तर भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या अनावर झाल्या की सर्वच नेत्यांच्या डोळ्यातून आपल्या लाडक्या नेत्यांसाठी जणू अश्रूंचे झरे स्त्रवले. राज्यमंत्री अमित देशमुख, आ. वैजनाथ शिंदे, व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी, मनसेचे अभय साळुंके, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, गंगाधर सरवदे, प्रा. व्यंकट कीर्तने, राष्टÑवादीचे मकरंद सावे, राकाँ प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, बबन भोसले यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी हजर होती. लातूर विमानतळावर अखेर कार्यकर्त्यांना मिळाली दर्शनाची संधी... गोपीनाथ मुंडे आणि लातूर यांचे नातेच वेगळे होते. ते जितके भाजपात लोकप्रिय होते तितकेच किंबहुना त्याहून जास्त विलासराव देशमुख यांचे जिवलग मित्र म्हणून लातूरच्या काँग्रेसमध्ये लोकप्रिय होते. गोपीनाथराव यांचे पार्थिव सुरूवातीला लातुरातून थेट परळीला विमानातून हेलिकॉप्टरने शिफ्ट करून विमानतळावरुनच नेण्याच्या हालचाली चालू होत्या. याची उद्घोषणाही लाऊडस्पीकरवरून करण्यात आली होती. परंतु राज्यमंत्री अमित देशमुख, आ. वैजनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांच्यासह माजी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, आ. सुधाकर भालेराव, खा. सुनील गायकवाड आदींनी राजीव प्रताप रुडी यांची भेट घेऊन लातूरमधील कार्यकर्त्यांसाठी पार्थिव थोडा वेळ का होईना ; विमानतळावर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही मागणी मान्य करून २० मिनिटांसाठी पार्थिव विमानतळावर ठेवले. अंत्यदर्शनाला भाजपासह काँग्रेसच्या नेत्यांचीही मोठी गर्दी होती.