शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

'मातोश्री'चे नेते ‘जलश्री’वर; महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री मनपा प्रशासकांच्या निवासस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:28 IST

After Aditya, Uddhav Thackeray at the residence of the Aurangabad Municipal Administrator जलकुंभांची पाहणी करून मुख्यमंत्री थेट ‘जलश्री’ या मनपा प्रशासकांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले.

ठळक मुद्देआदित्य यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे मनपा प्रशासकांच्या निवासस्थानीपाण्डेय यांचे मुख्यमंत्री दरबारी चांगलेच वजन असल्याचीही चर्चा

औरंगाबाद : महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि त्यांच्या पत्नी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या दिल्लीगेट येथील ‘जलश्री’ या निवासस्थानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. महापालिकेच्या इतिहासात मुख्यमंत्री प्रशासकांच्या निवासस्थानावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

उद्धव ठाकरेऔरंगाबाद शहरात दुपारी बारा वाजता दाखल झाले. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभाच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीगेट येथील महापालिका कर्मचारी निवासस्थानासमोर जलकुंभांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. गळ्यात इन्फेक्शन असल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी त्रास होत होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलणे त्यांनी टाळले. अवघ्या पाच मिनिटांत पाहणी करून मुख्यमंत्री थेट ‘जलश्री’ या मनपा प्रशासकांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी प्रशासकांच्या निवासस्थानी भेट दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री दहा मिनिटे ‘जलश्री’मध्ये होते. या भेटीसंदर्भात पाण्डेय यांनी ही कौटुंबिक आणि खाजगी भेट असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री ‘जलश्री’वर चहापानासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी तिथे चहापान केले नाही. गळ्याचा त्रास असल्याने कदाचित त्यांनी चहा टाळला असावा. यावेळी ठाकरे यांनी पाण्डेय यांचे ७ वर्षीय चिरंजीव देवमान याच्यासोबत हितगुज केले. त्यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी रवाना झाले.

आतापर्यंत ४० आयुक्त१९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली, तेव्हापासून आजपर्यंत जवळपास ४० पेक्षा अधिक आयुक्त आणि प्रशासकांनी औरंगाबादमध्ये काम पाहिले. मात्र, आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या ‘जलश्री’ या निवासस्थानावर भेट दिली नव्हती, हे विशेष.

१६ जानेवारी रोजी आदित्य ठाकरेशहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे लोकार्पण १६ जानेवारी रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासक पाण्डेय यांच्या जलश्री निवासस्थानाला भेट दिली होती.

पिता-पुत्राच्या भेटीमुळे चर्चाआदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाण्डेय यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने पाण्डेय यांचे मुख्यमंत्री दरबारी चांगलेच वजन असल्याचीही चर्चा राजकीय आणि अधिकारी वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद