परभणीत फिरत्या दंत रुग्णालयाचे लोकार्पण

By Admin | Updated: November 24, 2014 12:40 IST2014-11-24T12:01:22+5:302014-11-24T12:40:03+5:30

येथील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दंत रुग्णालयाचे लोकार्पण सहकार महर्षी माजी आ. अनंतराव देवसरकर यांच्या हस्ते २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

Launch of Parbhani Walking Dental Hospital | परभणीत फिरत्या दंत रुग्णालयाचे लोकार्पण

परभणीत फिरत्या दंत रुग्णालयाचे लोकार्पण

 परभणी: येथील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दंत रुग्णालयाचे लोकार्पण सहकार महर्षी माजी आ. अनंतराव देवसरकर यांच्या हस्ते २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. 
ग्रामीण भागातील रुग्णांच्या मौखिक कर्करोगाचे निदान, दातांचे व हिरड्यांचे आजार यावरील निदान व उपचार करण्यासाठी डॉ. प्रफुल्ल पाटील मोबाईल डेंटल हॉस्पिटलच्या वतीने फिरते दंत रुग्णालय सुरु करण्यात आले. 
या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला.याप्रसंगी अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष खा. राजीव सातव, खा.संजय जाधव, माजी खा. गणेशराव दुधगावकर, जि.प. सदस्या मेघना बोर्डीकर, अँड. श्रीकांत पाटील, शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. विद्या पाटील, समन्वयक डॉ. भरत देवसरकर, डॉ. सोनिया देवसरकर यांची उपस्थिती होती. (वाणिज्य /प्रतिनिधी)

Web Title: Launch of Parbhani Walking Dental Hospital