शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

ई-टेंडरिंगमध्ये लातूर मराठवाड्यात अव्वल !

By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST

पंकज जैस्वाल, लातूर आॅनलाईन ई-टेंडरींगमुळे निविदा प्रक्रीया अधिक पारदर्शक होत आहे़ याच धर्तीवर आता लिलाव पध्दतही सुधारली जाणार

पंकज जैस्वाल, लातूर आॅनलाईन ई-टेंडरींगमुळे निविदा प्रक्रीया अधिक पारदर्शक होत आहे़ याच धर्तीवर आता लिलाव पध्दतही सुधारली जाणार असून आॅनलाईन ई-आॅक्शनसाठी प्रशासकीय यंत्रणेला प्रशिक्षण दिले जात आहे़ सध्या आॅफलाईन असलेली शासकीय लिलावपध्दत आॅनलाईन होणार असल्याने लिलावात रिंग करुन बोली लावण्याच्या पध्दतीला आळा बसणार असल्याने महसूल उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे़ सरत्या आर्थिक वर्षात मराठवाड्यात सर्वाधीक ५३८ ई-निविदा लातूर जिल्ह्यात निघाल्या़ त्यामध्ये सुमारे ३०० निविदा महसूल विभाग व वाळूघाटांच्या आहेत़ तर ५० निविदा नगरपरिषद - महानगर पालिकेच्या यंत्रणांच्या आहेत़ मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात जेमतेम अडीचशे ते तीनशेच्या घरातच ई-निविदा अडखळल्या आहेत़ मराठवाड्यात ई-टेंडरींगमध्ये लातूर जिल्हा अव्वल स्थानावर असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़ विश्वंभर गावंडे यांनी सांगितले़ ई-आॅक्शन व ई-टेंडरिंग संदर्भात नवीन वित्तीय तरतूद करण्यात आली असून शासकीय लिलावांसंदर्भात लवकरच आॅनलाईन पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे़ महसूल, आरटीओ, गौण खनीज विभाग, महावितरण, बीएसएनएल, जिल्हापरिषद, महानगर पालिका, एमआयडीसी, सार्वजनीक बांधकाम विभाग आदी यंत्रणांच्या अधिकार्‍यांना याबाबत प्रशिक्षणाद्वारे आॅनलाईन लिलाव पध्दतीबाबत अवगत करुन देण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यात ३९ यंत्रणांना ई-निविदांबाबत बंधने घालण्यात आली आहेत़ प्रशिक्षणाला गैरहजर असलेल्या यंत्रणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे़ त्यामुळे ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेमध्ये लातूर जिल्हा अव्वलस्थानावर आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ विपिन शर्मा यांनी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कामांना गती दिल्यामुळे मराठवाड्यात आॅनलाईन निविदा सर्वाधिक संख्येने लातूर जिल्ह्याने काढल्या आहेत़ पूर्वी ई टेंडरिंगसाठी खाजगी कंपनीला पैसे भरावे लागायचे़ आता मात्र शासनाच्या एनआयसी विभागाचे नियंत्रण राहणार असल्यामुळे ई-टेंडरिंगमध्ये सहभागी होणार्‍याला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़ विश्वंभर गावंडे यांनी दिली़ तसेच ई-आॅक्शनसाठी गैरहजर असणार्‍या यंत्रणेच्या अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचेही ते म्हणाले़ दहा लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या कामाची निविदा आॅनलाईन काढणे यंत्रणेला बंधनकारक आहे़ तर पाच लाखापेक्षा अधिक रकमेचा लिलाव करण्यासाठी आॅनलाईन यंत्रणा अवलंबवावी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली़