शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत मोठी आवक सुरू

By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST

पैठण : नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वरील धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला

पैठण : नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वरील धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला असून, हे पाणी मंगळवारी मध्यरात्री धरणात दाखल होणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. मंगळवारी धरणात २२0५0 क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत असून, ३७ टक्के जलसाठा झाला आहे.गेल्या २४ तासांत नाशिकला जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे गोदावरीस महापूर आला आहे. सोमवारी नाशिक परिसरातील नाशिक ३३ मि. मी., गंगापूर २०० मि. मी., दारणा ६२ मि. मी. असा मुसळधार पाऊस झाला. नाशिक जलसंपदा विभागाने गंगापूर, दारणा व नांदूर मधमेश्वरमध्ये पाणी साठविण्यासाठी पाणी सोडून पॉकेट तयार करून ठेवले असल्याने तेथून नियंत्रित विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वरमधून २६८५३, गंगापूर ४७९८, दारणा ६४७0, मुळा १०००, नीळवंडे ३३६५, ओझर वेअर ३0८८ व भंडारदरा ४३९२ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मधमेश्वर ते जायकवाडी १५४ कि. मी. अंतर असून, तेथून सुटलेले पाणी येण्यासाठी २६ तासांचा अवधी लागतो. हे पाणी मंगळवारी मध्यरात्रीनंतर धरणात दाखल होण्यास प्रारंभ होईल, असे धरण नियंत्रण कक्षातून अभियांत्रिकी सहायक शेख अस्लम यांनी सांगितले. जायकवाडीवरील धरणात मुळा ९१.३५ टक्के, भंडारदरा १०० टक्के, दारणा ९७.५५ टक्के, गंगापूर ९४ टक्के, करंजवन ८८.४७ टक्के, ओझर वेअर ८३ टक्के, नांदूर मधमेश्वर ७९.३७ टक्के असा जलसाठा झाला आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी मंगळवारी १५0७.९३ फूट इतकी झाली असून, धरणात एकूण जलसाठा १५३८.५३0 द.ल.घ. मी. झाला आहे. या पैकी उपयुक्त जलसाठा ८00.४२४ द. ल. घ.मी. झाला आहे. (वार्ताहर)