शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बायपाससाठी लवकरच भूसंपादन

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : दीड वर्षापासून रखडलेल्या सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. बायपासच्या कामासाठी वाल्मी वगळता इतर सहा कार्यालयांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे नवीन बायपाससाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनीच सांगितले.
औरंगाबाद शहरातून जाणारा सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेरून नेण्याचा निर्णय नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीने दोन वर्षांपूर्वीच घेतला. त्यानुसार हायवे अ‍ॅथॉरिटीने नवीन बायपास निश्चित केला. त्यासाठी सुमारे ५६० कोटी रुपयांची तरतूदही केली. नियोजित बायपासच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर भूसंपादनाच्या संचिका दीड वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केल्या. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बायपाससाठी भूसंपादन करण्याआधी मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, रस्ते विकास महामंडळ, वाल्मी आदी शासकीय विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याची अट घातली. त्यामुळे गेल्या वर्ष दीड वर्षापासून हे काम रखडले होते.
दरम्यान, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी मनपा, सार्वजनिक बांधकाम, सिडको, रस्ते विकास महामंडळ, नगररचना विभाग आदींकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविले आहे. नवीन बायपासमुळे या विभागांचे रस्ते प्रभावित होणार आहेत. वाल्मीने अद्यापही नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.
वाल्मीची काही एकर जमीन बायपासमध्ये जाणार आहे. ही जागा देण्यास वाल्मी प्रशासनाचा विरोध आहे. मात्र, आता पाच विभागांनी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे जिल्हा प्रशासन भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास तयार झाले आहे.
विक्रमकुमार यांनी आज सांगितले की, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीचे अधिकारी येत्या दोन दिवसांत आमच्याकडे संबंधित विभागांची नाहरकत प्रमाणपत्रे सादर करणार आहेत. वाल्मीने नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. तेथून मार्ग वळविण्याचा पर्याय आहे. तो अवलंबिला जाईल किंवा नियोजित मार्ग कायम ठेवून भूसंपादनाची कार्यवाही केली आहे. जवळपास सर्वच विभागांच्या एनओसी मिळाल्यामुळे आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नियोजित बायपाससाठी भूसंपादनाच्या संचिका पाठविल्या होत्या.
मात्र, हा नियोजित बायपास सध्याच्या बीड बायपासपासून एक ते दीड किलोमीटर इतक्या जवळून समांतर रेषेत जात असल्यामुळे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याला आक्षेप घेतला. हा बायपास आणखी दुरून न्यावा, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी नवीन पर्यायांचा अभ्यास केला.
नवीन पर्यायांमुळे बायपासचे अंतर ५२ वरून ७५ किलोमीटर होणार असल्यामुळे ते परवडणारे नसल्याचा अहवाल हायवे अ‍ॅथॉरिटीने दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र घेऊन येण्याची अट घातली. या सर्व घडामोडींमुळे बायपासचे काम रखडले.
प्रकल्पाचा खर्च ५० कोटींनी वाढला
साताऱ्याच्या डोंगरातून जाणारा हा बायपास ५२ किलोमीटरचा आहे. सुरुवातीला या कामाचा खर्च सुमारे ५६० कोटी रुपये इतका होता.
गेल्या वर्षभरात किंमत १० टक्के म्हणजे सुमारे ५६ कोटी रुपये इतकी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
असा राहील बायपासचा मार्ग
बायपासची सुरुवात झाल्टा फाट्याच्या दीड किलोमीटर अलीकडून होईल.
गांधेली, सहारा सिटी, साताऱ्यातील डोंगराजवळून वाल्मीच्या मागील डोंगरातून पैठण रोडपर्यंत येऊन पोहोचेल.
तेथून सिडको महानगरच्या रस्त्याने एएस क्लब रस्त्याला येऊन मिळेल.
तेथून वडगाव कोल्हाटी, भांगसीमाता गड, माळीवाडा, कसाबखेडामार्गे वेरूळ रस्त्यावर हा महामार्ग जाऊन मिळेल.