घर फोडून २ लाखांचा ऐवज केला लंपास

By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:47:58+5:302014-05-27T01:01:34+5:30

नवीन नांदेड : चोरट्यांनी दारावरील कोंडा तोडून घरातील नगदी १२ हजार रूपयांसह २ लाख रूपयांचे सोन्या -चांदीचे दागिने लंपास केले.

Lakhs of rupees 2 lakhs have been displaced from the house | घर फोडून २ लाखांचा ऐवज केला लंपास

घर फोडून २ लाखांचा ऐवज केला लंपास

 नवीन नांदेड : चोरट्यांनी दारावरील कोंडा तोडून घरातील नगदी १२ हजार रूपयांसह २ लाख रूपयांचे सोन्या -चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना २५ मेच्या रात्री गोपाळचावडी येथील विवेकानंदनगर सोसायटीत घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या सिडको-हडको वसाहतीशेजारील गोपाळचावडी परिसरातील विवेकानंद नगर येथील रहिवासी व शिक्षिका तृप्ती गंगूलवार यांच्या घरासमोरील इमारतीत राहणारे त्यांचे भाऊ श्रीनिवास आटीपामुलू हे चार -पाच दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी २५ मेच्या मध्यरात्री ते २६ मे रोजी पहाटेच्या सुमारास श्रीनिवास आटीपामुलू यांच्या बंद घराच्या दारावरील ‘कोंडा’तोडून घरामध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सज्जावर कॅरिबॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व कपाटामधील चांदीचे भांडे तसेच नगदी १२ हजार रूपये चोरून नेले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ८ तोळे ४ गॅ्रम सोन्याचे दागिने ज्यामध्ये नेकलेस, साडेचार तोळ्याचे, १३ गॅ्रमचे मिनी गंठन, ९ गॅ्रमचे सोन्याचे टॉप्स, १० ग्रॅमचे झुमके, २ गॅ्रमचे सोन्याचे येड व ५०० गॅ्रम वजनाचे चांदीच्या भांडयासह ३२ इंची ‘एलसीडी’ टीव्ही असा १ लाख ९७ हजारांचा ऐवज पळविल्याची माहिती सहा. पो. उपनि. व्ही. व्ही. मुंडे यांनी दिली. याप्रकरणी तृप्ती गंगलवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला. (वार्ताहर)

Web Title: Lakhs of rupees 2 lakhs have been displaced from the house