तालुकानिहाय ग्रामसेवकांच्या अडचणी जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:43+5:302021-02-05T04:13:43+5:30
औरंगाबाद : बिडकीन ग्रामसेवकांच्या मृत्यूनंतर तेथील अनेक ग्रामसेवकांना वरिष्ठांकडून त्रास होता. ते दहशतीखाली होते हे समोर आले आहे. इतर ...

तालुकानिहाय ग्रामसेवकांच्या अडचणी जाणून घ्या
औरंगाबाद : बिडकीन ग्रामसेवकांच्या मृत्यूनंतर तेथील अनेक ग्रामसेवकांना वरिष्ठांकडून त्रास होता. ते दहशतीखाली होते हे समोर आले आहे. इतर तालुक्यातही ग्रामसेवकांना त्रास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा असा प्रकार घडू नये. यासाठी तालुकानिहाय आढावा घेऊन ग्रामसेवकांना वरिष्ठांकडून काही अडचणी आहेत का हे जाणून घ्या, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेत वर्षभरापासून बदल्या झाल्या नाहीत. मात्र, तालुकापातळीवर ग्रामसेवकांच्या महिन्यात दहा ते पंधरा बदल्या होत आहे. हे प्रकार आर्थिक देवघेवमधून होत असल्याचे नाकारता येत नाही. तसेच मोठ्या ग्रामपंचायतींवर ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराचाही आढावा घेण्याची वेळ आली आहे. काम करताना पंचायत समितीस्तरावरून ग्रामसेवकांना दडपण आणले जात आहे का, त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे प्रकार होताहेत का, याची चाचपणी करण्याची गरज असून, भविष्यात असे प्रकार घडू नये त्यासाठी उपाययोजनांची गरज असल्याची मागणी उपाध्यक्ष गायकवाड यांनी केली आहे.