वाढत्या महागाईमुळे ‘किचन बजेट’ बिघडले !

By Admin | Updated: August 18, 2016 00:57 IST2016-08-18T00:50:37+5:302016-08-18T00:57:27+5:30

राजकुमार जोंधळे , लातूर गेल्या पाच वर्षांतील महागाईचा उच्चांक मोडणाऱ्या महागाईमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. या बजेटच्या जुळवा जुळवीसाठी घरा-घरांतील गृहिणींची पुरती दमछाक होत आहे

'Kitchen Budget' has deteriorated due to rising inflation. | वाढत्या महागाईमुळे ‘किचन बजेट’ बिघडले !

वाढत्या महागाईमुळे ‘किचन बजेट’ बिघडले !


राजकुमार जोंधळे , लातूर
गेल्या पाच वर्षांतील महागाईचा उच्चांक मोडणाऱ्या महागाईमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. या बजेटच्या जुळवा जुळवीसाठी घरा-घरांतील गृहिणींची पुरती दमछाक होत आहे. डाळींचे भाव गगनाला गेल्यामुळे भोजनातील डाळींचे पदार्थ कमी झाले आहे. प्रत्येक वस्तू आणि खाद्य पदार्थांचा प्रति किलोचा आकडा लक्षात घेऊन त्याचे प्रमाण आहारात ठरविले जात आहे. मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत सगळ्यांनाच या महागाईने बेजार केले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, तेल, साखर, डाळी आणि अन्य किराणाही मोठ्या प्रमाणावर महागला आहे. एखादी वस्तू गेल्या महिन्यात शंभर रुपये किलोने आपण खरेदी केली असेल, तर ती पुढच्या महिन्यात १५० ते १६५ रुपये प्रति किलो दराने खरेदी करावी लागत आहे. भाजीपाल्यांचेही भाव दिवसागणिक गगनाला भिडत असल्याने भोजनातील भाज्यांची संख्याही आता कमी झाली आहे. किमान ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने भाज्यांचे दर आहेत. थेट बाजारातून खरेदी केले तर हा भाजीपाला ८० रुपयांचा ६० रुपये आणि १०० रुपयांचा ८० रुपये अशा दरात आपल्याला खरेदी करता येतो. दारावर आलेल्या भाजी विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर मात्र प्रति किलोला २० रुपये अधिक मोजावे लागतात.

Web Title: 'Kitchen Budget' has deteriorated due to rising inflation.