शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

किशनचंद तनवाणी यांचा भाजपासोबत घरोबा

By admin | Updated: September 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : किशनचंद तनवाणी हे भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. उद्या २७ रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांनी औरंगाबाद मध्य मधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. पक्षाकडे तिकिटही मागितले होते. उमेदवारी मिळेल या आशेनेच त्यांनी पराभव समोर दिसत असतानाही आॅगस्ट २०१३ मध्ये झालेली विधान परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली. मात्र, आ. प्रदीप जैस्वाल यांना आॅगस्ट २०१२ मध्ये पक्षाने उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे तनवाणी यांचा पत्ता कट झाला. निवडणूक लढविण्याच्या हेतूनेच तनवाणी यांनी भाजपासोबत घरोबा करून अनेक वर्षांची शिवसेनेची साथ सोडली.सेनेकडून आ.जैस्वाल यांनी २५ रोजी ‘मध्य’मधून अर्ज भरताच तनवाणी यांची अस्वस्थता वाढली. काल पूर्ण दिवस ते ‘नॉट रिचेबल’ होते. महायुती तुटल्याचे समजताच काल सायंकाळी तनवाणी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांची भेट घेऊन मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना उमेदवारी देण्याबाबत शुक्रवारी निश्चित झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाचे होर्डिंग्जही गुलमंडीवर झळकले. शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी सोबत असल्यामुळे त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने सेनेत अस्वस्थता वाढली आहे. १९८८ पासून सेनेचे काम करीत असलेले तनवाणी यांना पक्षाने शहराध्यक्ष, नगरसेवक, सभागृह नेता, महापौर, आमदार ही पदे दिली. एवढी पदे मिळूनही सेनेशी फारकत घेतली. भाजपात प्रवेश का केला, याचे उत्तर देताना तनवाणी म्हणाले, हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यामुळेच प्रवेश केला आहे. निवडणूक लढविणे हादेखील उद्देश त्यामागे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपली काहीही नाराजी नाही. सेनेत असताना तनवाणी यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवला होता. पक्षाकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेवटी सेनेला सोडचिठ्ठी दिली.