शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा नवजात बालिकेस पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:40 IST

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

औरंगाबाद : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे सदर आरोपी महिलेला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील नळणी येथील आसमाबी शेख आसेफ (२६) या महिलेने मंगळवारी (दि.३०) रात्री १ वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. दरम्यान, बुधवारी (दि.३१) दुपारी आसमाबी आईसह रुग्णालयात बसल्या असता तिथे एक अनोळखी बुरखादारी महिला आली व माझा गर्भपात झाला असल्याचे सांगितले. यावेळी दोघींनीही अनोळखी महिलेला धीर दिला. दरम्यान, आसमाबी व त्यांची आई लघुशंकेसाठी गेल्या असता ही संधी साधून बुरखाधारी महिला नवजात बालिका घेऊन पसार झाली.

आसमाबी व त्यांची आई परत आल्या असता त्यांना बालिका दिसून आली नाही. त्यामुळे आरडा-ओरड केली असता मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आजूबाजूला शोध घेतला असता बालिका आढळून आली नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोउनि. बजरंग कुठुंबरे हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालय परिसर पिंजून काढला. यानंतर शहरातील विविध ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सिल्लोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कॅमेरे शोभेची वस्तू उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षेकरिता दीड वर्षापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले; मात्र एक वर्षापासून बंद अवस्थेत असलेले कॅमेरे दुरुस्तीची कुणीही तसदी घेतली नाही. कॅमेरे दुरुस्तीबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या; मात्र दखल घेतली नाही, असे वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी सांगितले.

आमची चूक नाही  नवजात बालिका पळवून नेण्याचा प्रकार आईच्या दुर्लक्षामुळे घडला आहे. बाळाला एकटे सोडून त्यांनी जायला नको होते. याबद्दल त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना माहिती द्यायला हवी होती. त्यात आमची काय चूक, असा सवाल वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबूराव सपकाळ यांनी उपस्थित केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यKidnappingअपहरण