अपहृत तरुणाची पोलिसांनी केली सुटका

By Admin | Updated: May 17, 2016 00:34 IST2016-05-17T00:16:46+5:302016-05-17T00:34:01+5:30

औरंगाबाद : चार दिवसांपासून अपहरण झालेल्या तरुणाची सिडको पोलीस व गुन्हे शाखेने सोमवारी सुटका केली. याप्रकरणी सहा ते सात संशयिताना ताब्यात घेण्यात आले.

The kidnapped youth was released by the police | अपहृत तरुणाची पोलिसांनी केली सुटका

अपहृत तरुणाची पोलिसांनी केली सुटका

औरंगाबाद : चार दिवसांपासून अपहरण झालेल्या तरुणाची सिडको पोलीस व गुन्हे शाखेने सोमवारी सुटका केली. याप्रकरणी सहा ते सात संशयिताना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले की, सिडको भागातील संतोष पठाडे हा तरुण चार दिवसांपासून बेपत्ता होता. शोध घेऊनही तो सापडत नसल्याने हतबल झालेल्या नातेवाईकांनी सिडकोत तक्रार दिली.
पोलिसांनी विविध अंगांनी तपास केला. त्याच्या मित्रांचीही चौकशी केली. आर्थिक कारणातून संतोषचे अपहरण झाल्याचे निदर्शनास आले. संशयित अपहरणकर्ते व संतोषच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी ‘ट्रॅप’ केले असता, संतोष हा एकतानगर भागात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सिडको पोलिसांनी गुन्हे शाखेची मदत घेऊन या भागात ‘कोम्ब्ािंग आॅपरेशन’ राबविले आणि संतोषची सुटका केली. याप्रकरणी बाबा फरजन यांच्यासह अन्य एका संशयिताला सिडको व गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: The kidnapped youth was released by the police