शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिके धोक्यात

By admin | Updated: October 3, 2014 00:32 IST

कळंब : बोटावर मोजण्याइतपत गावात झालेल्या हलक्या सरी वगळता गेल्या महिन्याभरातील पावसाळा पूर्णपणे कोरडाठाक गेल्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन

कळंब : बोटावर मोजण्याइतपत गावात झालेल्या हलक्या सरी वगळता गेल्या महिन्याभरातील पावसाळा पूर्णपणे कोरडाठाक गेल्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन आणि फूल, पाती लागण्याच्या अवस्थेत असलेले कापूस यासह खरीप हंगामातील सुमारे ७३ हजार हेक्टरवरील इतर पिकेही धोक्यात आली आहेत. तालुक्यात लागवडीखालील १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६८ हजार हेक्टर क्षेत्रात साधारणपणे खरिपाचा पेरा होतो. परंतु, मागील दोन-चार वर्षात सरासरीपेक्षा पेरणी क्षेत्रात वाढ होत असून, यंदा ७८ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. ही पिके पूर्णत: मोसमी पावसावर अवलंबून आहेत. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाचे एक महिन्याने उशिरा आगमन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या उरकल्या. यानंतर अनेक शेतकऱ्यांना बियाणे उगवणुकीची समस्या जाणवली. ज्यांचे उगवले त्यांची पिकेही पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने धोक्यात आली. आॅगस्ट अखेर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, पुन्हा सप्टेंबर महिना कोरडाठाक गेल्यामुळे सोयाबीन, कापसासह सूर्यफूल, बाजरी, खरीप मका, ज्वारी ही पिकेही धोक्यात आली आहेत, उडीद, मुग, तीळ यासारखी अल्पजीवी पिके तर अधिच हातची गेली आहेत. तालुक्यात सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र ४२ हजार हेक्टर असताना यंदा मात्र तब्बल ५० हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याने तसेच ऐन दाणे लागण्यास सुरूवात होतानाच पावसाने दडी मारल्याने उभी पिके वाळून जात आहत. विशेत: हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे गेले आहे. (वार्ताहर)