शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

कडबा मार्केटची जागा पणन मंडळाच्या ताब्यात

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

औरंगाबाद : जुना मोंढा, जाफरगेट परिसरातील कडबा मार्केटचे स्थलांतर जाधववाडीत करण्यात येणार होते. यासाठी कडबा विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैसेही भरले होते;

औरंगाबाद : जुना मोंढा, जाफरगेट परिसरातील कडबा मार्केटचे स्थलांतर जाधववाडीत करण्यात येणार होते. यासाठी कडबा विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैसेही भरले होते; पण नंतर पाठपुरावा न केल्याने कडबा मार्केटची जागा पणन मंडळाने ताब्यात घेतली. परिणामी, आजघडीला जाधववाडीत जागा नसल्याने बाजार समितीने विक्रेत्यांचे पैसे परत करणे सुरू केले आहे. जाफरगेट परिसरात जेथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो, त्या ठिकाणी महानगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी ओटे व शेड बांधून दिले आहेत. त्या जागेवर अनेक वर्षांपासून कडबा विक्री होत आहे. परिणामी, ओटे असूनही भाजी विक्रेत्यांना मातीतच बसावे लागत आहे. या परिसरातून कडबा मार्केट हलविण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवासी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. येथील कडबा मार्केटचे जाधववाडीतील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर स्थलांतर करण्यासाठी २००७ मध्ये बाजार समितीने पुढाकार घेतला होता. यास येथील ३८ कडबा विक्रेत्यांनी प्रतिसाद देत प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे १ लाख ९० हजार रुपये बाजार समितीकडे भरले होते. मात्र, नंतर विक्रेत्यांनीही जागेसंदर्भात पुढील रक्कम भरली नाही. दुसरीकडे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पणन मंडळाने बाजार समितीला १४.५० कोटींची रक्कम दिली. बँकेच्या कर्जफेडीच्या मोबदल्यात बाजार समितीने पणन मंडळाला येथील १९ एकर जागा दिली. त्यानंतर येथील ५० एकरपर्यंत जागा पणन मंडळाने घेतली. यात कडबा मार्केटसाठीची जागाही पणन मंडळाच्या ताब्यात गेली. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव एन.ए. अधाने यांनी सांगितले की, आजघडीला बाजार समितीतील शिल्लक रिकाम्या जागा विविध व्यवसायांसाठी राखीव आहेत. यामुळे सध्या कडबा मार्केटसाठी आमच्याकडे जागा शिल्लक नाही; पण भविष्यात अन्य विवादित जागेचा निकाल बाजार समितीच्या बाजूने लागला, तर आम्ही कडबा मार्केट, गुरांच्या बाजारासाठी जागा उपलब्ध करून देऊ. ज्या कडबा विक्रेत्यांनी बाजार समितीकडे पैसे भरले आहेत, त्यांना पैसे वापस केले जात आहेत.1 अडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, कडबा मार्केटच्या जागेसाठी बाजार समितीने विक्रेत्यांकडून रक्कम घेतली होती. त्यापूर्र्वी किराणा व्यापारी, रॉकेल विक्रेत्यांकडूनही अशीच रक्कम घेतली. 2 कडबा मार्केटसाठी ४ एकर जागेचा प्रस्ताव होता. २००७ पासून बाजार समितीने कडबा विक्रेत्यांचे पैसे घेऊन ठेवले व आता जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांना पैसे परत केले जात आहेत. 3 पणन मंडळाने ५० एकर जागा घेऊन तिचा विकास केला नाही. यामुळे मंडळाकडील जागा परत घेऊन कडबा विक्रेते, किराणा व्यापारी व रॉकेल विक्रेत्यांना द्यावी नसता व्याजासह रक्कम व्यापाऱ्यांना परत करावी.