शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: May 31, 2014 00:28 IST

नांदेड : नांदेड जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे़

नांदेड : नांदेड जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे़ त्यांच्याकडून २२३ ग्रॅम सोने व इतर साहित्य मिळून तब्बल पावणेआठ लाखांचा माल जप्त केला आहे़ जिल्ह्यात घरफोड्या करणार्‍यांनाचा शोध घेण्याच्या सुचना विशेष पोलिस महानिरीक्षक जगन्नाथ यांनी दिल्या होत्या़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांनी विशेष पथक स्थापन केले होते़ या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे घरफोडी करणार्‍यांची टोळी पकडली़ संजय पंडीतराव नामनूर राग़ुंडलवाडी ताक़ळमनुरी, सय्यद शायद सय्यद जाफर रा़महेबुबनगर, सय्यद अतिक सय्यद चांदपाशा, शेख शफीक ऊर्फ बिल्डर शेख मोहिन रा़नांदेड यांना शिताफीने पकडले़ या चोरट्यांनी भाग्यनगर, शिवाजीनगर, लोहा आदी ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली़ या घरफोडीतील २२३ ग्रॅम सोने, ५५ तोळे चांदीचे दागिने, लॅपटॉप, एक बुलेट, होंडा युनिकॉर्न, दोन स्प्लेंडर असा मिळून एकूण ७ लाख ८५ हजार ५६५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला़ त्यानंतर या आरोपींना स्थानिक पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले़ पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सय्यद फहिम, पोहेकॉ बळीराम दासरे, बालाप्रसाद जाधव, देवीदास चव्हाण, बालाजी सातपुते, पिराजी गायकवाड, भानुदास वडजे, दिनानाथ शिंदे, बोंडलेवाड, रमाकांत शिंदे यांचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)