शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

जांगीड इलेव्हन उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:37 IST

सकल मारवाडी युवा मंचतर्फे एडीसीए मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय जैन्युईन सकल मारवाडी क्रिकेट स्पर्धेत जांगीड इलेव्हन संघाने यारा इलेव्हन संघावर ८ धावांनी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य सामन्यांत अग्रसेन स्पार्टन संघाने शिखवाल इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली.

औरंगाबाद : सकल मारवाडी युवा मंचतर्फे एडीसीए मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय जैन्युईन सकल मारवाडी क्रिकेट स्पर्धेत जांगीड इलेव्हन संघाने यारा इलेव्हन संघावर ८ धावांनी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य सामन्यांत अग्रसेन स्पार्टन संघाने शिखवाल इलेव्हन संघावर ६ गडी राखून मात केली.
जांगीड इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना ९.४ षटकांत सर्वबाद ६७ धावा केल्या. त्यांच्याकडून सूरज सुलानेने ११ व गोपाल पहाडेने १६ धावा केल्या. अन्य फलंदाजांनी निराशा केली. यारा संघाकडून आदित्य डी. याने १५ धावांत ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यारा इलेव्हन १० षटकांत ६ बाद ५९ या धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून एस. समाधान याने १९ चेंडंूत ३ चौकार खेचत सर्वाधिक ३१ धावा काढल्या. जांगीड संघाकडून सूरज सुलानेने १ धावेत २ बळी घेतले.
दुसºया लढतीत शिखवाल इलेव्हनने १० षटकांत ५ बाद ६० धावा उभारल्या. त्यांच्याकडून गणेश एस.ने १६ धावा केल्या. अग्रसेनकडून प्रदीप व विनीतने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात अग्रसेन स्पार्टन संघाने ८.३ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून पीयूष बगाडियाने १०, मयंक तायलने १४ धावांचे योगदान दिले. शिखवाल इलेव्हनकडून अनिल पंडितने २ बळी घेतले.