जिनिंग मालकाला २५ लाखांना फसविले

By Admin | Updated: January 20, 2015 01:27 IST2015-01-20T01:14:19+5:302015-01-20T01:27:52+5:30

सिल्लोड : येथील एका जिनिंग मालकाकडून उधारीवर पशुखाद्य खरेदी केले. त्यांना दीड महिन्यात पैसे देण्याचा करारही झाला; मात्र आता मालेगाव येथील दोघांनी

Jinping deceived the owner of 25 lakhs | जिनिंग मालकाला २५ लाखांना फसविले

जिनिंग मालकाला २५ लाखांना फसविले


सिल्लोड : येथील एका जिनिंग मालकाकडून उधारीवर पशुखाद्य खरेदी केले. त्यांना दीड महिन्यात पैसे देण्याचा करारही झाला; मात्र आता मालेगाव येथील दोघांनी पैसे देण्यास नकार दिल्याने २५ लाखांना फसवणूक झाल्याची फिर्याद जिनिंगचे व्यवस्थापक राजेशकुमार जैन यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील वर्धमान बाबूलाल बडजाते व अन्य एक यांनी सिल्लोड येथील पूनित इंटरप्रायजेस कॉटन जिनिंग व प्रेसिंग (डोंगरगाव फाटा, सिल्लोड) यांच्याकडून २५ लाख २८ हजार ४८८ रुपयांचे पशुखाद्य उधारीवर खरेदी केले होते. त्यांनी दीड महिन्यात पैसे देण्याचा करारही केला होता; मात्र त्यांनी वेळेत पैसे दिले नाहीत, तसेच वारंवार पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जिनिंगचे व्यवस्थापक राजेशकुमार जैन (रा. कुडकेश्वरवाडी, मध्यप्रदेश, ह.मु. सिल्लोड) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (वार्ताहर)

Web Title: Jinping deceived the owner of 25 lakhs