शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चोरांची ‘झारखंड गँग’ पुन्हा सक्रिय, छ. संभाजीनगरात अवघ्या अर्ध्या तासात चोरले डझनभर मोबाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:28 IST

शिर्डीत मुक्काम करून आसपासच्या शहरांत साधतात डाव; शेतकऱ्यांनीच चोरांना पकडून धुलाई करत पोलिसांच्या हवाली केले.

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल चोरांची 'झारखंड गँग' पुन्हा शहरात सक्रिय झाली असून, जाधववाडीत सकाळच्या सत्रात अवघ्या अर्ध्या तासात १२ पेक्षा अधिक मोबाइल चोरुन हैदोस घातला. रविवारी सकाळी ८:१५ ते ८:४५ दरम्यान एकाच वेळी अनेकांचे मोबाइल चोरीला गेल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला होता.

कोलठाणचे शेतकरी प्रभाकर आहेर (५२) हे नियमित जाधववाडीत भाजी खरेदीसाठी येतात. १९ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता ते भाजीपाला खरेदीसाठी आले होते. पंधरा मिनिटांनी त्यांना त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्याच वेळी अन्य जागेवरून मोबाइल चोरीला गेल्याने आरडाओरड सुरू झाली. त्यांनी मित्रासह चोरांचा शोध सुरू केला. संशयास्पद तरुण दिसताच पकडून विचारपूस केल्यावर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. उत्तर देताना भंबेरी उडाल्याने त्यांना थेट सिडको पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीत त्यांची राेहनकुमार बिलोप्रसाद चौरसिया (२०), अनिल मंडू नोनिया (२०, दोघे रा. साहेबगंज, झारखंड), अशी नावे असल्याचे समोर आले, तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला. रोहनकुमार, अनिलवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

१२ पेक्षा अधिक मोबाइल लंपासआहेर यांच्यासह ज्ञानेश्वर सोनवणे, संजय वाघ, राजेश दंडनाईक, विष्णू अंभोरे, संजय वरकड, संदीप हरणे, धनसिंग म्हस्के, ज्ञानेश्वर सुरासे, नारायण आधापुरे, नूर मोहम्मद नबी शेख, सुरेश जाधव आदींसह १२ पेक्षा अधिक मोबाइल जाधववाडीतून चोरीला गेले.

सहा महिन्यांपूर्वी टोळी पकडलीजाधववाडीत सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे झारखंड, बिहारहून मोबाइल चोरण्यासाठी आलेल्या टोळीचे साथीदार रंगेहाथ पकडून शेतकरी, व्यापाऱ्यांनी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यात काही अल्पवयीन मुलांचादेखील सहभाग होता. त्यांच्या म्होरक्याचा शोध मात्र लागू शकला नाही. विशेष म्हणजे, जाधववाडीत सातत्याने लुटमार, चोरीच्या घटना घडत आहेत.

शिर्डीत मुक्काम, म्होरक्यांवर टेहळणीची जबाबदारीरविवारी पकडलेल्या दोघांपैकी एकाकडे चोरीचा केवळ एक मोबाइल मिळाला. अन्य मोबाइल टेहळणी करणाऱ्यांकडे होते. मोबाइल चोरून तत्काळ म्होरक्यांकडे सुपुर्द करून पुन्हा दुसरे सावज शोधण्याची त्यांना सूचना असते. ही टोळी काही दिवसांपासून शिर्डीत मुक्कामी होती. शिर्डीत स्वस्त दरात राहणे होते. त्यामुळे तेथे राहून आसपासच्या शहर, जिल्ह्यातील बाजारपेठेत जाऊन हे चोरी करतात. विशेष म्हणजे, बाजारपेठा अधिक असलेल्या जिल्ह्यांत मुक्कामाचा कालावधी ठरवतात. दोन ते तीन दिवस चोरी करून ते तत्काळ शहर सोडतात. महिना, दोन महिन्यांनी पुन्हा त्या शहरात जातात, असे चाैकशीत समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jharkhand gang active again, dozens of mobiles stolen in Aurangabad.

Web Summary : A Jharkhand gang stole over a dozen mobiles in Aurangabad's Jadhavwadi market within half an hour. Two suspects were arrested; the gang stayed in Shirdi, targeting busy markets before quickly moving on.
टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर