जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:07 IST2019-06-24T22:06:59+5:302019-06-24T22:07:37+5:30

भरधाव जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

jeep hit bikerider injured | जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

वाळूज महानगर: भरधाव जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रांजणगाव येथील दत्तनगर फाट्यावर घडली.


किरण सारंगधर कोथलकर (२८, रा. हनुमाननगर रांजणगाव) हा रविवारी सकाळी ९ वाजता दुचाकीने (एमएच-२०, बीडब्ल्यु- २३२७) कामाला जात होता. दत्तनगर मार्गे जात असताना ९.३० वाजेच्या सुमारास रामनगरकडून येणाऱ्या भरधाव जीपने (एमएच-२०, बीसी-४८१७) दुचाकीला जोराची धडक दिली.

यात किरणच्या हाता-पायाला जबर मार लागला असून एक पाय पॅक्चर झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: jeep hit bikerider injured