शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

तो क्षण आनंद आणि अभिमानाचा

By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST

मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वाजारोहण केल्यानंतरचा क्षण आनंद देणारा आणि अभिमान वाटावा असा असतो, असे मत शिपाई रामदास मालकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

अशोक कारके
औरंगाबाद : ज्या राष्ट्रध्वाजाला सर्व नागरिक मानवंदना देतात. त्या ध्वाजारोहणात आपला काही सहभाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. ध्वज बांधणे आणि उतरविणे हे जबाबदारीचे काम आहे. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वाजारोहण केल्यानंतरचा क्षण आनंद देणारा आणि अभिमान वाटावा असा असतो, असे मत शिपाई रामदास मालकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
वीस वर्षे सैन्यदलात नोकरी केल्यानंतर सौनिक सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेत नोकरी करताना पुन्हा देश सेवा करण्याची संधी ध्वज बांधताना आणि उतरवताना मिळत आहे. यापूर्वी सैन्यदलातही त्यांच्यावर ध्वज बांधण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी होती. हे काम करताना जबाबदारी आणि दक्षता पाळावी लागते. ध्वज बांधताना सकाळी नियोजित वेळेच्या आत आणि केसरी रंग वरच्या बाजूने येईल, अशा पद्धतीने बांधावा लागतो. त्यामध्ये ध्वाजारोहणप्रसंगी विविध रंगांच्या फुलांचा वर्षाव होईल, अशा पद्धतीने फुले बांधावी लागतात. त्याचबरोबर एका विशिष्ट पद्धतीने ध्वज बांधावा लागतो.
अगदी सहज गाठ सुटेल, अशी दक्षता पाळवी लागते. त्यानंतर ही मान्यवरांच्या हस्ते ध्वाजारोहण व्यवस्थित होईल का? याचे मनात दडपण असते. यामुळे ध्वाजारोहणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी पूर्ण भान हरवून जातो. ही एक युद्धात उतरल्यासारखी मोठी जाबाबदारी आहे; पण हे अभिमानस्पद काम करण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही. ते काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान मानतो आणि अभिमान बाळगतो, असे मत मालकर यांनी व्यक्त केले.