शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:50 IST

तांत्रिक त्रुटी, मागणीत वाढ; ९०० मि.मी. जलवाहिनीतून फक्त २६ एमएलडी पाणी वाढेल

छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम १०० टक्के पूर्ण होण्यास डिसेंबर २०२६ उजाडणार आहे. त्यामुळे सध्याच्या १२००, ७०० व ९०० मि.मी. जलवाहिन्यांवरच शहराची तहान भागवावी लागेल. अलीकडच्या काळात ९०० मि.मी.ची जलवाहिनी २०० कोटींतून टाकण्यात आली असली तरी त्यातून ७५ ऐवजी फक्त २६ एमएलडी पाणी वाढणार असल्याने पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी, वाढलेली लोकसंख्या, क्षमतेपेक्षा जास्त मागणीमुळे शहरात पाणीबाणीचे चित्र पुढील दीड ते दोन वर्षे कायम राहील. 

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पाणीपुरवठा वितरणातील त्रुटी आणि योजनेतील कामांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकारांशी चर्चा करीत वस्तुस्थिती समोर आणली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, मनपाचे अभियंता एम. एम. काजी, के. एम. फालक यांची उपस्थिती होती.

पत्रकारांनी प्रशासनास केलेले प्रश्नपत्रकार : नागरिकांना रोज पाणीपुरवठा दोन वर्षांनी तरी होईल काय?प्रशासन : सध्या तसे सांगता येणार नाही.

पत्रकार : राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब होतोय का?प्रशासन : राजकीय दबाव नाही.

पत्रकार : पाच दिवसांत ६५० एमएलडी पाणी जाते कुठे?प्रशासन : नेटवर्क वाढले आहे, साठवण जलकुंभ नाही.

पत्रकार : मनपा, एमजीपीच्या तांत्रिक वादाचा भडका उडतोय का?प्रशासन : नाही, मनपा तांत्रिक एक्सपर्ट नाही, एमजेपी एक्सपर्ट आहे.

पत्रकार : एमजीपी मुख्य अभियंत्यांमुळे वाद वाढत आहे काय?प्रशासन : नाही, तसे काहीही नाही.

पत्रकार : मनपात प्रशासकीय राजवटीमुळे सर्व आलबेल आहे?प्रशासन : मनपात लोकप्रतिनिधी असते तर सर्व संतुलित राहिले असते.

मनपात, प्राधिकरणात वाद नाही९०० मि.मी. योजनेतून २६ एमएलडी पाणी वाढेल. ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शटडाऊन घेऊन पंपहाऊसचे काम करावे लागेल. नवीन याेजनेचा कंत्राटदार बदलणे शक्य नाही. दंड आकारणे, नोटीस देणे, दुसरा कंत्राटदार शोधणे या बाबी कागदावर छान वाटतात. परंतु, वस्तुस्थितीला धरून नाहीत. विद्यमान कंत्राटदार योजनेच्या कामास तयार आहे. निधीची अडचण नाही. कंत्राटदाराने योजनेच्या रोडमॅपमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत काम होईल, असे सांगितल्याचे मुख्य अभियंता पलांडे यांनी सांगितले.

मनपा सत्ताधाऱ्यांनी १२० कि. मी. नेटवर्क वाढविले२०१५ ते २०२० पर्यंतच्या मनपा सत्ताधाऱ्यांनी नो नेटवर्क एरियामध्ये १२० कि.मी. जलवाहिन्या टाकल्या. त्यावरील नळकनेक्शन रेकॉर्डवर नाही. रोजी पाणी देण्यासाठी वितरण व्यवस्था सक्षम नाही. २०२२ ते २४ पर्यंत ५ दिवसांआड पाणीपुरवठा झाला. २५०० मि.मी. जलवाहिनी योजनेच्या कामामुळे १२०० व ७०० मि.मी.च्या जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत. परिणामी, पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे. ८५ टक्के वसाहतींना पाणीपुरवठा होत असून, १५ टक्के भागांत अडचण आहे. ९०० मि.मी.च्या नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी मिळाले तर समस्या सुटेल, असे मत मनपाचे अभियंता काजी यांनी मांडले.

सध्या किती पाणीपुरवठा होतो?सध्या १ लाख २८ हजार नळकनेक्शन आहेत. १३० एमएलडी पाणी रोज मिळते. २८० एमएलडी पाण्याची गरज आहे. ९०० मि.मी. नवीन जलवाहिनीचे डब्ल्यूटीपीचे बांधकाम बाकी आहे. ७०० मि.मी.ची जुनी जलवाहिनी बंद करून ९०० मि.मी.ची सुरू करावी लागेल. त्यामुळे शहराला १२०० व ९०० मि.मी. जलवाहिनीतून १४० एमएलडीच पाणी मिळेल. ९०० मि.मी. जलवाहिनीचे पंप बसविण्यासाठी ७०० मि.मी.वरील तांत्रिक यंत्रणा वापरण्यासाठी शटडाऊन घ्यावे लागेल. शटडाऊन घेणे सध्या शक्य नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी