शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांचा प्रश्न आला ऐरणीवर

By admin | Updated: May 11, 2015 00:34 IST

बीड : गेवराई शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या (मुलांची) जागेवर बिअरबार असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे

बीड : गेवराई शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या (मुलांची) जागेवर बिअरबार असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही जागा गायरान असल्याचे नायब तहसीलदारांनी उच्च न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. अशी गंभीर बाब असूनही आतापर्यंत प्रशासन गप्प का आहे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील सर्व्हे नं. ५८ हा गायरान जमिनीचा भाग आहे. या भागात जिल्हा परिषद शाळा (मुलांची) १९५७ पासून सुरू आहे. तसा उल्लेखही पाहणीपत्रकात आहे. दरम्यान, गेवराई येथील गोपाळ बब्रुवान लोखंडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, शाळेच्या मोकळ्या जागेवर राजकीय व्यक्ती किंवा पैशाच्या बळावर काही व्यक्तींनी सदरील शाळेची जागा ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण केले. १९९९ मध्ये लोखंडे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर झेड. पी. सीईओंनी बीडीओंना सूचना देत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. अर्ध्या एकर जागेवर हे अतिक्रमण झाले असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. २०१०-११ मध्ये लोखंडे यांनी सातबारा मोजणीचा अर्ज दिला होता. तसेच १० फेब्रुवारी २०१२ रोजी ऋषीकेश कैलास बेदरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.दरम्यान, २७.८.२०१३ रोजी गेवराई तलाठ्यानी तहसीलदार यांच्याकडे पॅलेस बिअरबार व भगवती हॉटेल अँड बिअरबार बाबत पत्र दिले होते. त्यापूर्वी २५.२.२०११ रोजी गेवराई नगर परिषदेने मीराबाई संतोष चौधरी व त्रिंबक प्रतापराव मोटे यांना बिअरबार व परमिट रूमसंबंधी एनओसी दिली होती. शाळेच्या जागेवर अतिक्रमणे असतानाही त्या ठिकाणी एनओसी देण्यात आली. मुळात न. प. ने ही परवानगी नाकारायला हवी होती. (प्रतिनिधी)गेवराईचे नायब तहसीलदार कल्याण हरिभाऊ जगरवाल यांनी उच्च न्यायालयाला २० एप्रिल २०१५ रोजी दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, पाहणीपत्रकानुसार १९५७ पासून सर्व्हे नं. ५८ वर जिल्हा परिषद शाळा सुरू आहे. ही जागा गायरान किंवा शासकीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सातबारानुसार सर्व्हे नं. १/१ आणि १/२ ही जागा गायरान किंवा सरकारची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई शहरातील नवीन बसस्थानक ते जिल्हा परिषद शाळा भागापर्यंत असणारी जागा ही गायरान जमीन आहे. या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. लोखंडे यांनी केवळ एका जागेवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे. अतिक्रमण काढण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या तर या भागातील इतर अतिक्रमणे काढण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या भागात अतिक्रमणे होईपर्यंत प्रशासनाने काय केले या संदर्भात न्यायालयाने विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जून महिन्यातच शिक्षण विभाग व गेवराई नगर परिषद अधिकाऱ्यांना कोर्टासमोर हजर रहावे लागणार आहे. त्यानंतर याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.