शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामचा दहशतवादाशी संबंध नाही - कमरूजमा आजमी

By admin | Updated: May 8, 2014 23:43 IST

जालना : दहशतवादामुळे मुस्लिम समाजसुद्धा प्रचंड त्रस्त असून दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही.

 जालना : दहशतवादामुळे मुस्लिम समाजसुद्धा प्रचंड त्रस्त असून दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही. काही लोक राजकीय फायद्यासाठी दहशतवादाशी इस्लामचा संबंध जोडत असल्याचा आरोप जागतिक इस्लामी मिशनचे सचिव मौलाना कमरूजमा आजमी यांनी केला. येथील राजाबाग सवार दर्गा उरूस निमित्त प्रवचनासाठी आजमी मंगळवारी जालना येथे आले होते. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, मुस्लिम देशांमध्ये काही लोक दहशतवादाचा आधार घेऊन राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना अमेरिका मदत करीत असल्याचा आरोपही आजमी यांनी केला. दहशतवाद वाढण्याचे कारण शोधले पाहिजे, असे सांगून आजमी म्हणाले की, इस्लामची शिकवण शांतता, बंधुभाव, मानवता ही आहे. त्याचा प्रचार व प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा आपला उद्देश आहे. आपल्या या कामाची दखल इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरेन यांनी घेतली. जागतिक पातळीवरील दहशतवादाबाबत त्यांनी आपल्यासमवेत चर्चा केली, असे आजमी यांनी सांगितले. देशात मुस्लिम समाजाला भाजपाची विशेषत: नरेंद्र मोदींची भीती घातली जात आहे, याविषयी आजमी म्हणाले, मुस्लिम समाजाने भाजपाची किंवा मोदींची भीती बाळगण्याचे कारण नाही. देशात लोकशाही आहे. जगभरात सर्वाधिक लोकशाहीचे अधिकार भारतातच आहेत, असेही ते म्हणाले. भारतीय लोकशाहीची त्यांनी प्रशंसा केली. भारतातील मुस्लिम समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अराजकीय संघटनेची गरज आहे. समाजातील युवकांनी त्या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहनही आजमी यांनी केले. यावेळी सय्यद जमील रजवी, फेरोज बागवान आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)