शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

जमीन गहाण, सोने तारण ठेवून केबीसीमध्ये गुंतवणूक

By admin | Updated: July 19, 2014 00:40 IST

शिरीष शिंदे, बीड मल्टी लेव्हल मार्केटींग (एमएलएम) स्कीमने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे अनेकवेळा समोर आले असतानाही अनेकांना अल्पावधीत श्रीमंत होण्याचा मोह आवरत नाही.

शिरीष शिंदे, बीडमल्टी लेव्हल मार्केटींग (एमएलएम) स्कीमने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे अनेकवेळा समोर आले असतानाही अनेकांना अल्पावधीत श्रीमंत होण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे नाशिक येथील केबीसी कंपनीत बीड जिल्ह्यातील दहा हजार लोकांनी कोट्यवधीची गुंतवणूक करुन स्व:तच्या पायावर दगड मारुन घेतला. विशेष बाब म्हणजे माजलगाव तालुक्यातील उमरी येथील शेतकऱ्यांनी स्वत:ची जमीन गहाण, सोन तारण ठेवून केबीसीमध्ये गुंतवणूक केली असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. गुंतवणुकदारांना अल्प मुदतीत पैसे दामदुपट्ट करण्याचे आमिष केबीसी कंपनीने दाखवून बीड जिल्ह्यातील जवळपास हजार लोकांना पन्नास कोटी रूपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आल्यानंतर आता हळूहळू गुंतवणूकदारांनी कशा प्रकारे गुंतवणूक केली याची माहिती समोर येऊ लागली आहे. एका व्यक्तीला लाभ मिळाल्यानंतर तो त्याची मार्केटींग करायचा त्यामुळे अनेकांना केबीसीवर विश्वास बसला. उच्च शिक्षित लोकांनी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढतच गेली. केबीसीमध्ये बीड जिल्ह्यातील परळी, धारुर, माजलगाव तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविले आहे. केबीसीचे बीड जिल्ह्यात शंभरहून अधिक एजंट असून त्यांच्या मार्फत दहा हजार लोकांनी गुंतवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कोेणत्याही एजंटशी संपर्क होऊ शकला नसल्याने गुंतवणूकदारांची ंपूर्ण आकडेवारी समोर येऊ शकली नाही शेतकऱ्यांनी ठेवली जमीन गहाणमाजलगाव तालुक्यातील पात्रुड व उमरी येथील शेतकऱ्यांनी केबीसीमध्ये गुंतविण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी स्वत:ची जमीन गहाण ठेवली तर काही जणांनी सोने तारण ठेवून. दोन वर्षे सतत पैसे मिळत असल्याने ‘रिफे्रन्स’ पद्धतीचा अवलंब करुन एजंट लोकांनी गुंतवणूकदारांची संख्या वाढवली मात्र शेवटी सर्व सामान्यांना लाखो रुपयांचा चुना लावला गेला.तक्रारी आल्या नाहीत- रेड्डीकेबीसीमध्ये गुंतवणूक करणारे बीड जिल्ह्यात असतील मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात केबीसीविरुद्ध अद्याप तक्रारी दाखल करण्यात आल्या नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलेजिल्ह्यातील एजंट नाशिकमध्येबीड जिल्ह्यातील केबीसीचे काम करणाऱ्या एजंटची संख्या शंभरहून अधिक आहे. केबीसीमध्ये गुंतवणूकदार वाढल्याने एजंटांची चांगलीच चांदी झाली व त्यांनी अल्प काळात अत्याधुनिक पद्धतीची चार चाकी वाहने खरेदी केली. मात्र आता कंपनीचा घोटाळा उघडकीस अल्याने बीड जिल्ह्यातील एजंटांना त्यांनी वर्षभरापूर्वीच खरेदी केलेली चार चाकी वाहने विक्री काढत असून गुंतवणूकदारांचे पैसे परत देत आहे. काही गुंतवणूकदार नाशिक येथे कंपनी विरुद्ध तक्रार देण्यासाठी जाऊन बसले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.