शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या वैद्यकीय पथकाची होणार चौकशी

By admin | Updated: December 11, 2014 00:24 IST

हिंगोली : फिरत्या वैद्यकीय पथकाची अनागोंदी उघड झाल्यानंतर आता वरातीमागून घोडे नाचविणाऱ्या जि. प. च्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावून चौकशीचे आदेश दिले

हिंगोली : फिरत्या वैद्यकीय पथकाची अनागोंदी उघड झाल्यानंतर आता वरातीमागून घोडे नाचविणाऱ्या जि. प. च्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावून चौकशीचे आदेश दिले. मात्र यात सखोल चौकशी करून प्रसंगी संबंधितावर कठोर कारवाईचे निर्देश जि. प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांनी दिले आहेत.पथकामार्फत औंढा, कळमनुरी व वसमत तालुक्यातील चाळीस गावांत सेवा दिली जाते. यात राजदरी, टेंभूर्णी, आमदरी, राजापूर, दरेगाव, खाटोडा तांडा, वाघी, शिंगी, मरसूळवाडी, खापरखेडा, रामवाडी, कुंभारवाडी, घोळवा, मोरवाडी, पार्डी, चिंचोर्डी, धानोरा, ढोलक्याची वाडी, कडपदेव, डोंगरगाव, मुधळ, जटाळवाडी, बिबगव्हाण, बेलथर, कुंभारवाडी, तोंडापूर, उमरदरावाडी, कोपरवाडी, भुरकेवाडी, माळधावंडा, काळ्याची वाडी, पावनमारी, महालिंगी, जामगव्हाण, टव्हा, बोल्डावाडी, निमटोक, वापटी, कुपटी या गावांचा समावेश आहे.आरोग्य विभागाने केवळ दिखावेगिरी करण्यासाठी नोटिसा बजावण्याची भूमिका घेतली आहे. असे न करता त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फंत तपासणी केली तर किती दिवस डॉक्टरांची हजेरी असते. किती रुग्ण तपासणी होते. आशा वर्कर, अंगणवाडीमार्फत किती नावे नोंदली जातात व मागच्या नोंदवहीनुसार किती रुग्णांची नावे लिहिली जातात, याबाबी त्यामुळे समोर येण्यास मदत होणार आहे. या वाहनातील मनुष्यबळ प्रशिक्षित असले तरी त्यांना दिले जाणारे वेतनही कमी आहे. यात नर्सला ११६६४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्मात्यास ९१00 तर चालकांना ७६१४ रुपये देणे अपेक्षित आहेत. मात्र चार हजारांवर कुणालाही वेतन दिले जात नाही.याशिवाय देखभाल व दुरुस्तीसाठी ७ लाख १0 हजार, साहित्य देखभाल ४0 हजार, औषधी खरेदीसाठी ४.१६ लाख, वस्तू खरेदी १.४२ लाख व इतर खर्चासाठी १.१0 लाखांची तरतूद आहे. मात्र यापैकी किती खर्च होतो अन् किती बनवेगिरी याचा शोध आरोग्य विभागालाही लागणे अवघड आहे. कारण त्यांच्या पाठिंब्यावरच हे सगळे अगदी डोळे झाकून सुरू आहे. (वार्ताहर)