शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

बोगस विहिरींची एसीबीकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:51 AM

घनसावंगी तालुक्यात २०११-२०१३ दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत मंजूर ९२ विहिरी बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. याप्रकरणाची गोपनीय चौकशी पूर्ण झाली असून एसीबीने आता खुल्या चौकशीला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात २०११-२०१३ दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत मंजूर ९२ विहिरी बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. याप्रकरणाची गोपनीय चौकशी पूर्ण झाली असून एसीबीने आता खुल्या चौकशीला सुरुवात केली आहे. गुरुवारी लाचलुचपतच्या वरिष्ठ अधिका-यांनी महसूल अधिका-यांना सोबत घेऊन कुंभार पिंपळगाव येथील आठ शेतकºयांच्या शेतात जाऊन चौकशी केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस नाईक संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, ज्ञानेश्वर मस्के, ग्रामविकास अधिकारी श्रीरंग थोटे, भूमी अभिलेख छाननी लिपिक उकळकर, दुरुस्ती लिपिक चाळक, मंडळ अधिकारी आप्पासाहेब खोटूळे, तलाठी जोगदंड, कंधारे यांचा या पथकात समावेश होता. पथकातील अधिकाºयांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन विहिरींचा कामांंची पाहणी केली. तसेच महसूल अधिकाºयांकडील जुने रेकॉर्ड तपासून विहिरींची छायाचित्रेही काढली. २०११-१३ दरम्यान, घनसावंगी तालुक्यात मग्रारो मध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी वर्षा पवार यांच्या कार्यकाळात तालुक्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या विहिरी असंख्य विहिरी या बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्या आधारे तालुक्यातील १८ गावांत ही चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत विभगाचे उपअधीक्षक निकाळजे यांनी सांगितले. मात्र, त्यांनी याविषयी सविस्तर माहिती देण्याचे टाळले. तालुक्यातील अठरा गावांमध्ये ही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एसीबीच्या अधिका-यांनी अशाच प्रकारे चौकशी केली होती. मात्र, पुढे काहीच झाले नाही. आता नवीन अधिकारी आल्यामुळे पुन्हा ही चौकशी करण्यात येत आहे. दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील ग्रामसेवकांना जालना येथे बोलावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोपनीय चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.