शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्यांमागे चौकशीचा ससेमिरा

By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST

कळंब : तंटामुक्त समित्यांमागे आता शासन निर्णयानुसार बक्षिसाच्या रकमेचा विनियोग झाला नसल्याने चौकशी व कारवाईचा ससेमिरा लागला आहे.

कळंब : गावातील तंटे गावातच मिटवून गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी स्थापन केलेल्या तंटामुक्त समित्यांमागे आता शासन निर्णयानुसार बक्षिसाच्या रकमेचा विनियोग झाला नसल्याने चौकशी व कारवाईचा ससेमिरा लागला आहे. खर्च करताना नियमांचे उल्लंघन झाल्याने समिती पदाधिकार्‍यांवर रक्कम निश्चित करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित गावातील पदाधिकारी व पुढार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत, दाखल झालेले तंटे व नव्याने निर्माण झालेले तंटे आपसात मिटवून गावात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात आली. या योजनेत अनेक गावांनी सहभाग नोंदविला. काही गावांत चांगले फलितही मिळाले. तंटामुक्त गाव योजनेत भाग घेणार्‍या व २०० पैकी २०० गुण मिळालेल्या गावास पात्र ठरवून बक्षिसाची रक्कम देण्यात येते. त्यानुसार कळंब तालुक्यातील २६ गावांना ६८ लाख रूपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. मोहा, डिकसळ, ईटकूर, या गावांना प्रत्येकी ७ लाख, कन्हेरवाडीला ५ लक्ष, हसेगाव, मस्सा खंडेश्वरी या गावांना प्रत्येकी ४ लाख, आंदोरा, हावरगावला प्रत्येकी ३ लाख, सात्रा, पिंपळगावला प्रत्येकी दोन लाख तर खडकी, भोगजी, कोठाळवाडी, बहुला, आडसूळवाडी, ताथर्डी, भाटसांगवी, आथर्डी या गावांना प्रत्येकी १ लाख रूपये वितरित करण्यात आले. परंतु, बक्षिसाच्या रक्कमा मिळाल्यानंतर मात्र, या गावांतील समितींचे आर्थिक व्यवहाराचे अनेक तंटे बाहेर येऊ लागले आहेत. कारणे दाखवा नोटीस परिशिष्ट सातनुसार बक्षिसाच्या रकमेचा विनियोग न केल्याप्रकरणी पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांनी ६ मे रोजी २ लाख रूपयांच्या अनियमिततेसाठी मोहा, ३१ हजार ४९८ रूपयांसाठी आडसूळवाडी, ३१ हजार ५०० रूपयांसाठी भाटसांगवी, २४ हजार २४१ रूपयांसाठी गंभीरवाडी, १४ हजार ५०० रुपयांसाठी आठळा, ३३ हजार १५० रूपयांकरिता शेळका धानोरा, ३१ हजारांसाठी कोठाळवाडी येथील पदाधिकार्‍यांना उपरोक्त रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. यासोबतच हासेगाव (के.), खेर्डा, आंदोरा, बहुला येथील पदाधिकार्‍यांना अभिलेखे सादर न केल्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित गावच्या ग्रामसेवकांनाही नोटीस देऊन आपली एक वार्षिक वेतनवाढ का बंद करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटिसेद्वारे करण्यात आली आहे. फौजदारी गुन्हे दाखल करावेत तंटामुक्त योजनेसाठी बक्षिसाची रक्कम गृहविभागाकडून देण्यात येते. या रक्कमेचा विनियोग गृह विभागाने दिलेल्या निर्देशानुसार होणे गरजेचे होते. परंतु, गावपुढार्‍यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी कचरू टकले यांनी केली आहे. परिशिष्ट सात काय सांगते? ४गृहविभागाच्या शासन निर्णयात बक्षीस मिळालेल्या रक्कमेचा विनियोग कसा करायचा याबाबत परिशिष्ट ७ मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक निर्णय ग्रामसभेने घ्यावा, निर्णय घेताना २ टक्के रक्कम पुरस्कार समारंभासाठी, १५ टक्के रक्कम प्रचार, प्रसिद्धीसाठी, ५ टक्के रक्कम प्रशासकीय बाबींसाठी १५ टक्के रक्कम शिक्षणासाठी प्रोत्साहन आदी निकषांचा समावेश आहे. परंतु, याकडे गावपुढार्‍यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले होते. पंचायत समिती स्तरावर झाली होती चौकशी कचरू टकले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कळंब पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी एस. ए. भांगे, व्ही. व्ही. बावीकर, यांना २९ एप्रिल रोजी चौकशीसाठी नेमले. यावेळी सदरील पथकाने वस्तुनिष्ठ चौकशी करू गटविकास अधिकार्‍यांना २ जुलै २०१३ रोजी आपला अहवाल सादर केला होता. त्यानुसार मोहा, भाटसांगवी, गंभीरवाडी, खोंदला, कोठाळवाडी आदी गावांमध्ये शासन निर्देशानुसार बक्षिसाची रक्कम खर्च झाले नसल्याचे उजेडात आले. तर काही गावांनी चौकशीसाठी रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीकारी यांनी चौकशी करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तक्रारीमुळे पितळ उघडे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेअंतर्गत बक्षीसपात्र ठरलेल्या गावात प्राप्त रक्कमेचा विनियोग न करता भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कचरू टकले यांनी ५ मार्च २०१३ रोजी केली होती. या तक्रारीकडे सर्वसंबंधितांकडून डोळेझाक केली जात असताना टकले यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली. त्यानंतर प्रशासनाने चौकशीचा फास आवळला.