‘इन्कलाब जिंदाबाद’ने दणाणले शहर

By Admin | Updated: December 13, 2014 23:34 IST2014-12-13T23:34:19+5:302014-12-13T23:34:19+5:30

सोमनाथ खताळ ल्ल बीड ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ जिंदाबाद’, ‘विद्रोही साहित्य हेच खरे साहित्य’, ‘एकच साहेब बाबासाहेब’ अशी घोषणाबाजी करीत शाळा,

'Inquilab Zindabad' is a city sculpted | ‘इन्कलाब जिंदाबाद’ने दणाणले शहर

‘इन्कलाब जिंदाबाद’ने दणाणले शहर


सोमनाथ खताळ ल्ल बीड
‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ जिंदाबाद’, ‘विद्रोही साहित्य हेच खरे साहित्य’, ‘एकच साहेब बाबासाहेब’ अशी घोषणाबाजी करीत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक, महिला, युवक, युवती, तरूण, तरूणी, बालगोपाळ रॅलीत सहभागी झाले होते़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सकाळी ९़५० वाजता सुरूवात झाली़ राज्यभरातून आलेल्या विविध कलापथकांनी महापुरूषांच्या नावाने घोषणाबाजी केली़ महामानवाच्या पुतळ्याजवळून निघालेली रॅली माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड, नगर नाका मार्गे थेट साहित्य नगरीत पोहचली़ साहित्यनगरीत रॅली पोहचल्यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फटाक्यांची आतिषबाजी करीत रॅलीचे स्वागत करण्यात आले़ यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती़
प्राण्यामध्ये जाती असतात परंतु मानवात नाही़ पुरूषाला जीव आहे आणि स्त्रीला नाही काय ? स्त्री-पुरूष सारे कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने, ये आझादी झुठी है, देश की जनता आजभी भूखी है, ज्याला ज्ञान व विवेक लाभला त्याला सर्वोत्तम दौलत लाभली यासारखे विविध संदेश विद्यार्थ्यांच्या हाती असलेल्या फलकातून देण्याचा प्रयत्न केला़
जळणारे दीपच खरे संत असतात़ विचारमंचावरील सर्वांच्या समोर हे दीप जळत आहे़ अशीच ज्योत आपल्या अंतर्ज्ञानात जळायला पाहिजे़ असे जर झाले तर यह ज्योत दुनिया को भस्म कर सकती है, इतनी ताकद इस ज्योत में है़ महाराष्ट्रातील दलित पँथरच्या माध्यमातून या चळवळीला प्रेरणा मिळाली़ त्याच्यामुळेच आज ही चळवळ यशस्वीरित्या सुरू आहे़ पुरोगामी शक्ती ही मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी अशा तीन भागात मांडता येते़ सर्वसामान्यांचा शत्रू जर कोणी असेल तर तो फक्त भांडवलशाही आहे़ यह हिंदू राष्ट्र नहीं, यह भारत है़ दिशा आणि लक्ष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सांगून उद्घाटक चंद्रशेखर पाटील यांनी भाषण संपविले़ हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ते बोलले़

Web Title: 'Inquilab Zindabad' is a city sculpted