शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीमुक्ती संघटनेचा पुढाकार; विवाहितेची सुटका

By admin | Updated: December 31, 2015 13:49 IST

पतीकडून घटस्फोटाची मागणी करणार्‍या महिलेची स्त्री मुक्ती संघटना आणि वाशी पोलिसांच्या मदतीने नातलगांच्या तावडीतून मंगळवारी सुटका करण्यात आली.

 

वाशी : पतीकडून घटस्फोटाची मागणी करणार्‍या महिलेची स्त्री मुक्ती संघटना आणि वाशी पोलिसांच्या मदतीने नातलगांच्या तावडीतून मंगळवारी सुटका करण्यात आली असून, तिला आता पुण्यातील स्त्री मुक्ती संघटनेच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब येथील या विवाहितेचे लग्न वाशी येथील प्रतिष्ठित कुटुंबातील युवकासोबत पंधरा वर्षांपूर्वीझाले होते.विवाहानंतर हे दाम्पत्य व्यवसायानिमित्त पुणे येथे गेले होते.तेथे तीन-चार वेळा पतीला व्यवसायात अपयश आल्यामुळे सदर विवाहिता स्वत:च नोकरी करून घरगाडा चालवित होती.दरम्यान, सदर विवाहितेने काही कारणामुळे पतीकडून घटस्फोट मागितला होता.यासाठी तिने पुणे येथील टिळक रोडवरील स्त्रीमुक्ती संघटनेकडेही मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.याची कुणकूण पतीसह या विवाहतेचा भाऊव सासरच्या मंडळींना लागली.त्यामुळे २८डिसेंबर रोजी या विवाहितेचा भाऊ, दीर व पती यांनी तिला बाहेर जेवायला जायचे आहे, असे म्हणून पुणे (चाकण)येथील घरातून बाहेर काढले.परंतु, आपली जीप पुण्याच्या बाहेर जात असल्याचे लक्षात आल्यामुळे तिने याबाबत विचारणा केली.मात्र, दमदाटी करून तिला गप्प राहण्यास सांगितले. यानंतर सदर विवाहितेने रस्त्यात जीपमधून उडी मारण्याचाही प्रयत्न केला.मात्र, तिला ते शक्य झाले नाही. अखेर या सर्वांनी तिला वाशी येथील घरी आणले.दरम्यान, येथे पोहोंचेपर्यंत सदर महिलेने स्त्री मुक्ती संघटनेच्या पदाधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवरून संदेश पाठवून आपणाला मनाविरूध्द वाशी येथे नेले जात असल्याचे कळविले होते. स्त्री मुक्ती संघटनेने याबाबत तातडीने उस्मानाबाद पोलिसांना कळविले.प्रकरण नाजूक असल्यामुळे हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्राकडे सोपविण्यात आले.२९डिसेंबर रोजी वाशी, कळंब व उस्मानाबाद येथील महिला तक्रार निवारण केंद्रातील समुपदेशक कोमल धनवडे, संध्या तेरकर, वर्षाझगडे व सुप्रिया फारणे यांनी वाशी येथील पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांची भेट घेऊन याप्रकरणी मदत करण्याची विनंती केली.प्रकरणाचे गांभिर्यओळखून ठोंबरे यांनीही स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांना त्यांच्या मदतीसाठी दिले. या सर्वांनी सदर विवाहितेच्या घरी जावून चौकशी केली असता ती घरातच आढळून आली.पोलिस व महिला समुपदेशन केंद्रातील महिलांना पाहताच या विवाहितेने हंबरडा फोडला. यावेळी तिने मला सासरी रहायचे नाही, असे सांगून या कर्मचार्‍यांसोबत थेट पोलिस ठाण्यात आली. या ठिकाणी ठोंबरे यांच्याकडे तिने आपली व्यथा मांडल्यानंतर तिचा जबाब घेऊन तिला तक्रार निवारण केंद्रातील समुपदेशकांच्या स्वाधिन करण्यात आले. सदर महिलेस आता पुण्यातील स्त्री मुक्ती संघटनेकडे पाठविले येणार आहे. (वार्ताहर)