शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेचा वाढता आलेख

By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST

संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़

 संजय तिपाले , बीड कॉपीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु बीड जिल्ह्याने ही प्रतिमा पुसून गुणवत्तेत भरारी घेण्यास सुरुवात केली आहे़ मागील पाच वर्षांत जिल्ह्याच्या गुणवत्तेचा आलेख चढताच राहिला आहे़ यावर्षीही बीडने ९२़३६ टक्के गुणांसह विभागात आपले वर्चस्व निर्माण केले आहे़ बीड जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी म्हटले की, अनेकजण नाक मुरडतात़ कॉप्यांच्या सुळसुळाटाने गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; परंतु बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आता ही ओळख पुसण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुषंगाने कॉपीमुक्तीचा नाराही सातत्याने घुमत आहे़ सामाजिक संस्था, शिक्षण विभागाने कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न केले़ त्याचा च परिणाम म्हणून आता बीड जिल्ह्यातील विद्यार्थी स्वत:ची गुणवत्ता प्रामाणिकपणे सिद्ध करण्यासाठी सरसावू लागले आहेत़ मागील पाच वर्षांतील गुणवत्तेवर प्रकाशझोत टाकल्यावर हे स्पष्ट होते की, आता बीडचे विद्यार्थीही मागे राहिले नाहीत़ २०१० मध्ये जिथे जिल्ह्याचा एकूण निकाल ७१़७४ टक्के इतका खाली होता तो २०१४ मध्ये ९२़३६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे़ जिल्ह्याची वाटचाल कॉपीतून कॉपीमुक्तीकडे सुरु आहे़ मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८.४४ टक्के होता. या वर्षी त्यात तब्बल १२ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. गुणवत्तेत बीड जिल्ह्याने विभागात आपले स्थान भक्कम केले आहे़ विभागात अव्वल स्थान पटकाविणार्‍या बीडने यावर्षीही आपले स्थान कायम राखण्यात यश मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील मुलं हुशारच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख कायम राखण्याचे आव्हान यापुढे पेलवावे लागणार आहे़ प्राध्यापकांना श्रेय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बारा टक्के निकाल अधिक लागला आहे़ बीडमध्ये वर्षभर अध्ययन व अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे केले जाते़ सराव परीक्षा होतात, प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे वैयक्तिक लक्ष देतात़ त्यामुळेच बीड जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे. मुली एकाग्रतेने अभ्यास करतात त्यामुळे त्या मुलांना मागे टाकू शकल्या. या यशाचे श्रेय प्राध्यापकांबरोबरच पालकांनाही जाते, अशी प्रतिक्रिया बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वर्षनिकाल २०१०७१़७४ २०११७८़७७ २०१२७६़२१ २०१३८८़४४ २०१४९२़३६ जिल्ह्यात बीड तालुक्याची सरशी बीड जिल्ह्याच्या एकूण निकालात बीड तालुक्याने दणदणीत यश संपदान करुन छाप सोडली़ बीड तालुक्याने ९४़२० टक्के निकाल लागला आहे़ त्यापाठोपाठ गेवराई व वडवणी तालुक्याचा ९४़१८ टक्के इतका निकाल लागला़ ९३़७४ टक्के मिळवून केज तालुक्याने तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. धारूर सर्वात तळाशी आहे. धारूरचा निकाल फक्त ८६.७६ टक्के इतका आहे.