सुमेध वाघमारे, तेर२०१३ च्या भीषण दुष्काळी काळात लेडिज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून तेर (ता़उस्मानाबाद) परिसरात तेरणा नदीपात्रात शिरपूर पॅटर्न राबविण्यात आला. गत आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शिरपूर उपक्रमांतर्गत खोदलेल्या सुमारे १३ फुट खोल खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, परिसरातील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे़ परिणामी याचा गावकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होणार आहे़जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना तीन-चार वर्षात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. याला तेरही अपवाद नव्हते. या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील तरेणा नदीपात्रात शिरपूर पॅटर्नचे काम हाती घेण्यात आले़ २०१३ च्या गुढीपाडव्यादिनी या उपक्रमास माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला़ लोकसहभागातून हे काम ३ महिन्यात पूर्ण करण्यात आले़ वाळूमिश्रीत मातीच्या सहाय्याने दोन्ही बाजूंनी बांध मजबुतीकरण करण्यात आले़ हे काम पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने या पॅटर्नचा अपेक्षित परिणाम दिसून आला नव्हता़ यंदा मात्र, गत आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस पडल्याने नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे़ त्यामुळे परिसरातील जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत प्रतिवर्षापेक्षा अधिकची वाढ झाली असून, याचा शेतकऱ्यांसह पशुपालकांना मोठा लाभ होताना दिसत आहे़ शिवाय गावातील अनेकांच्या कुपनलिकांमधील पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे़ शिरपूर पॅटर्नमुळे तेर परिसराला मोठा लाभ होत असून, हा आदर्शवत पटर्न इतर गावात राबवून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे़अशी धावली वाहनेतेर गावानजीक येथील तेरणा नदीपात्रात तीन महिन्यात शिरपूर पॅटर्नचे काम पूर्ण करण्यात आले आहे़ हे काम करण्यासाठी तब्बल ७५० ट्रॅक्टर, ३ पोकलेन, २ जेसीबी अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती़ या कामासाठी जवळपास ५० लाख रूपये खर्च करण्यात आला असून, तब्बल ७२ हजार मेट्रीक टन वाळू मिश्रित गाळाचा उपसा करण्यात आला होता.सातत्याने जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे़ शिरपूर पॅटर्न राज्यात गाजत असून, त्याद्वारे जलस्त्रोतांच्या पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे़ त्या धर्तीवर तेर येथे शिरपूर पॅटर्नचा उपक्रम राबविण्यात आला आहे़ यंदा चांगला पाऊस झाल्याने या उपक्रमाचा पाच किलोमीटर परिसरातील शेतकरी, सर्वसामान्यांना लाभ होत असून, यापुढील काळात इतर गावात हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांनी सांगितले़
शिरपूर पॅटर्नमुळे जलस्त्रोतांच्या साठ्यात वाढ
By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST
सुमेध वाघमारे, तेर २०१३ च्या भीषण दुष्काळी काळात लेडिज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून तेर (ता़उस्मानाबाद) परिसरात
शिरपूर पॅटर्नमुळे जलस्त्रोतांच्या साठ्यात वाढ
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}