शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणाच्या दरात प्रतिक्विंटल ३ हजारांची वाढ

By admin | Updated: June 6, 2014 01:07 IST

नांदेड : अधिच गारपीट व अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांपुढे बी-बियाणाच्या दरवाढीचे संकट उभे राहिले असून

नांदेड : अधिच गारपीट व अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांपुढे बी-बियाणाच्या दरवाढीचे संकट उभे राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन बियाणाच्या दरात प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी सोयाबीनचे बियाणे ५८०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र यंदा ९ हजार रुपयावर पोहचले आहे. यामुळे शेतकरी बियाणाची खरेदी करतांना मेटाकुटीला येत आहे. धानाच्या किंमती ४५०० रुपयावरुन ६ हजार रुपयावर पोहचल्या.याशिवाय खताच्या किंमतीही वाढल्याने शेतकर्‍यांना भाववाढीचा जबर फटका सोसावा लागणार आहे.अवेळी पडलेल्या पावासामुळे सोयाबीन, तुर व धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीनला शेतातच अंकुर फुटून सोयाबीन काळे पडले. परिणामी बाजारात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी बियाणाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.गतवर्षीचे सोयाबीनचे दर असे- १८०० ते १८५० (प्रति ३० किलो)होते. परंतु यावर्षी त्यात दीडपटीने वाढ झालेली आहे. या वर्षी सोयाबीनचे दर २३८५ ते २७०० रुपये (प्रति ३० किलो) याप्रमाणे दर आहेत. यंदा बाजारात चांगल्या दर्जाचे सोयाबीन अल्प प्रमाणात आल्यामुळे बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या तुलनेत यंदा कापूस बियाणाच्या दरात वाढ झालेली नाही. यामुळे एका सोयाबीन बियाणाच्या बॅगची खरेदी करण्यासाठी लागणार्‍या पैशामध्ये कापसाचे तीन पाकिटे येतात.यामुळे वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी कापूस या पिकाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणाचे दर असे- सोयाबीन-जुने दर ५८००-६००० प्रतिक्विंटल, ७९५०, धान ४५००, ६०००, तूर ९२००, १० हजार, कापूस ९५०, ९५० (प्रति पाकिट), खताचे दर- १०.२६.२६ १०९५, १०९७, डीएपी ११८१, १२६०, २०.२०.०० ७६९, ९४५, एमओपी ८४०, ८४० एसएसपी ३९५, ३९५, युरिया २८०, २८४, १५.१५.१५ ७७८, ७८० याप्रमाणे दर आहेत. (प्रतिनिधी)