शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यांवर युनिपोल नामक यमदूत उभे; अचानक संख्या वाढू लागली

By मुजीब देवणीकर | Updated: May 23, 2024 19:26 IST

युनिपोल उभारणीत वाहतूक पोलिसांची साधी एनओसीसुद्धा घेतली जात नसल्याची बाब समोर आली.

छत्रपती संभाजीनगर : मुंबईच्या घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील सर्व होर्डिंग आणि दुभाजकांत उभेे केलेल्या युनिपोलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पावला-पावलांवर युनिपोल यमदूतासारखे उभे करण्यात आले आहेत. हवामान बदलताच वादळ-वारे कधीही घोंघावू लागले. सोसाट्याचा वारा वाहू लागला; तर हे युनिपोल अजिबात कोसळणार नाहीत, याची गॅरंटी कोणीही द्यायला तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर शहरात युनिपोलची संख्या जवळपास ३०० पर्यंत पोहोचली आहे, हे विशेष.

सोशल मीडियामुळे होर्डिंग व्यवसायाला बऱ्यापैकी फटका बसला तरी या क्षेत्रातील एजन्सीधारकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे होर्डिंग उभारणे सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकात एका लोखंडी पोलवर २४ बाय १२ आकाराचे होर्डिंग उभारले. याची उंची साधारण २० फुटांपर्यंत असते. वजन ८०० ते १००० किलो असते. होर्डिंगचेच निकष महापालिका, स्मार्ट सिटीने युनिपोलला लावले आहेत. यातून महापालिकेला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते असेही नाही. एका युनिपोलमागे महापालिकेला वर्षाला फक्त १५ हजार रुपये मिळतात. स्मार्ट सिटीनेही मोठ्या प्रमाणात अशा युनिपोल उभारणीला परवानगी दिली. ही परवानगी देताना महापालिकेला विचारलेही नाही.

पाहता-पाहता शहरात अशा पद्धतीचे ३०० पेक्षा अधिक युनिपोल विविध एजन्सीधारकांनी उभे केले. मागील महिन्यात वादळी वाऱ्याने शहरात ८०पेक्षा अधिक झाड उन्मळून पडले. शहानूरमियाँ दर्गा रोडवर एक युनिपोलचा भागही कोसळला. सुदैवाने तेव्हा रस्त्यावर कोणीही नव्हते. महापालिका प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. युनिपोल उभारणीत वाहतूक पोलिसांची साधी एनओसीसुद्धा घेतली जात नसल्याची बाब समोर आली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचे उघडपणे उल्लंघन होत आहे.

युनिपोलजवळ कोणी उभे राहत नाही
वादळी वारा, पाऊस सुरू झाल्यावर दुभाजकाजवळ कोणी उभे राहत नाही. आजपर्यंत युनिपोल कोसळल्याची घटना घडली नाही. त्याचे बेसमेंट खूप मजबूत असते. वाहनाचा धक्काही लागला तरी युनिपोल कोसळू शकत नाही. महापालिकेने, स्मार्ट सिटीने एजन्सीधारकांकडून स्टॅबिलेट सर्टिफिकेट घ्यावे. काढून टाकणे हा उपाय नाही. त्यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
- शेख हबीब, अध्यक्ष, होर्डिंग असोसिएशन
 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका