शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कारखाली चिरडले, कोणाला मदतही करू दिली नाही; अखेर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:46 IST

वाट्या भाईने कारखाली चिरडलेल्या तरुणाचा मृत्यू; ५ आरोपींवर खुनाचा गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : खुनाची धमकी देत कारखाली चिरडलेल्या सूरज रमेश देवकाते (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी (दि. २६) पहाटे मृत्यू झाला. गत पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. या प्रकरणात अटक पाच आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

पैठण रोडवरील संताजी पोलिस चौकीसमोर सराईत गुंड नवनाथ ऊर्फ वाट्या भाई मोटे याच्या कारने (एमएच २०, जीई ९९७१) सूरजला २० एप्रिलच्या रात्री जोराची धडक दिली. या घटनेपूर्वी दोघांमध्ये पाटोदा रोडवरील एका बीअरबारसमोर पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि एकमेकांकडे खुन्नस देण्यावरून वाद झाला होता. याचाच राग मनात धरून कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजच्या अंगावरून कार रिव्हर्स घेऊन त्याला चिरडले. सूरजच्या भावासह इतरांनी त्यास जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाट्या भाई आणि त्याच्या साथीदारांनी याला कोणीही उचलू नका असे म्हणत दहशत माजवली. या गुंडांनी चरण आणि इतर मित्रांनाही बेदम मारहाण केली. तब्बल २० मिनिटे या टोळक्याने रस्त्यावर राडा घालत जखमीला वेळेवर उपचार मिळण्यापासून रोखले होते. सूरजवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

सातारा पोलिसांकडून पाच आरोपी अटकया घटनेनंतर सातारा ठाण्याचे उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने मुख्य सूत्रधार नवनाथ ऊर्फ वाट्या भाई मोटे याच्यासह भागवत गजानन मोटे, आकाश गोविंद वाघमोडे, अभिषेक दहिवाळ आणि गोरख दिलीप शिंदे (सर्व रा. कांचनवाडी) या पाच आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर नातेवाइकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त करीत ठाण्यासमोर २३ एप्रिलला आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न हे कलम वाढवले. आता सूरजचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man crushed by car, denied help, dies; murder charge filed.

Web Summary : Suraj Devkate, crushed by a car in Chhatrapati Sambhajinagar after a dispute, died during treatment. Accused prevented aid. Police have filed murder charges against five arrested individuals following protests over the initial investigation.
टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर