शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पार्सलच्या नावाखाली गुटख्याची आयात

By admin | Updated: August 15, 2014 01:14 IST

औरंगाबाद : परराज्यांतून चक्क ट्रॅव्हल्स बसमधून औरंगाबाद शहरात पार्सलच्या नावाखाली गुटखा आयात करण्यात येत असल्याचे सोमवारी क्रांतीचौक पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले.

औरंगाबाद : राज्यात गुटखा बंदी आहे. अशा परिस्थितीत परराज्यांतून चक्क ट्रॅव्हल्स बसमधून औरंगाबाद शहरात पार्सलच्या नावाखाली गुटखा आयात करण्यात येत असल्याचे सोमवारी क्रांतीचौक पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले. मध्य प्रदेशातील इंदौर येथून शहरातील मनमंदिर ट्रॅव्हल्समधून आणण्यात आलेले तब्बल अडीच लाखांच्या गुटख्याचे पार्सल क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी पकडले.
बसमधून पार्सल उतरवून ते शहरात विक्रीसाठी पोहोचते करणाऱ्या ज्ञानेश्वर साहेबराव टेकाळे (रा. अंगुरीबाग) व मनोज ईश्वरलाल खंडेलवाल (रा. जवाहर कॉलनी) या दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. हे दोघे मनमंदिर ट्रॅव्हल्सचे कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर म्हणाले, शहरात गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅव्हल्स बसमधून गुटखा आणण्यात येत असल्याची पोलिसांकडे माहिती होती. आज दुपारी जालना रोडवरील मनमंदिर ट्रॅव्हल्सच्या एका बसमधून पार्सलमध्ये गुटख्याचा मोठा साठा आणण्यात आला आहे, अशी पक्की खबर पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी समद पठाण, प्रकाश डोंगरे, सुनील जाधव, सतीश साळवे, मुनीर पठाण यांनी अन्न व औषधी विभागाचे अधिकारी गोपाल कासार यांच्यासह मनमंदिर ट्रॅव्हल्स गाठले. त्यावेळी ट्रॅव्हल्सच्या बसमधून आलेले पार्सल ट्रॅव्हल्सच्याच एका रिक्षात भरून ते घेऊन आरोपी ज्ञानेश्वर व मनोज निघालेले पोलिसांच्या नजरेस पडले. संशय आल्याने पोलिसांनी एमएच-२० एटी- ५१८० या क्रमांकाची रिक्षा अडविली. त्यात पार्सलचे बॉक्स भरलेले होते. पोलिसांनी या बॉक्सबाबत विचारणा केली असता त्यात एका जणाचे काही तरी पार्सल आहे, असे ज्ञानेश्वर आणि मनोजने सांगितले. शेवटी पोलिसांनी ते बॉक्स फोडले. तेव्हा या सर्व बॉक्समध्ये विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. या सर्व बॉक्समध्ये एकूण २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा गुटखा असल्याचे आढळून आले. तो सर्व माल पोलिसांनी जप्त केला आणि आरोपी ज्ञानेश्वर व मनोज या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील रिक्षाही जप्त करण्यात आली. ही रिक्षा मनमंदिर ट्रॅव्हल्सचीच असल्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगितले.
इंदौरहून आणण्यात येत होता गुटखा
महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. आसपासच्या काही राज्यांमध्ये अद्याप बंदी नाही. त्यामुळे परराज्यांतून रेल्वे, ट्रॅव्हल्समधून अशा पद्धतीने गुटखा आणल्या जातो आणि तो दामदुप्पट दराने विकल्या जातो.
क्रांतीचौक पोलिसांनी पकडलेला हा अडीच लाखांचा गुटखाही मध्य प्रदेशातील इंदौर शहरातून आणण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
४गुटख्याचे हे पार्सल कुणी मागविले होते आणि कुणासाठी, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगितले.