अवैध बांधकाम; शंभर जणांवर गुन्हे दाखल होणार

By Admin | Updated: August 18, 2015 00:51 IST2015-08-18T00:22:45+5:302015-08-18T00:51:13+5:30

जालना : शहरातील विविध प्रभागांत अवैध बांधकाम करणाऱ्या तब्बल शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत.

Illegal construction; Hundreds of cases will be filed against 100 people | अवैध बांधकाम; शंभर जणांवर गुन्हे दाखल होणार

अवैध बांधकाम; शंभर जणांवर गुन्हे दाखल होणार


जालना : शहरातील विविध प्रभागांत अवैध बांधकाम करणाऱ्या तब्बल शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत.
शहरात काही वर्षांपासून अवैध बांधकाम करण्याचा धडाका सुरु आहे. काही नागरिकांनी बांधकामाचे सर्व नियम ढाब्यावर बसवून बांधकाम केलेले आहे.
शहरातील जुना तसेच नवीन जालना भागात पालिकेच्या जागांवर अनेकांनी बिनदिक्कत मोठे बांधकाम केलेले आहे. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करुनही उपयोग झालेला नाही. काही नागरिक नगर पालिकेलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. शहरात छोटे मोठे मिळून शंभर पेक्षा अधिक लोकांनी अवैध बांधकाम केले आहे.
नगर पालिका एफएसआयने काम करा असे सांगत असले तरी नगर पालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी पळवाटा शोधून मदत करीत असल्याचा आरोपही होत आहे.
अवैध बांधकामात प्रामुख्याने नगर पालिकेच्या जागेवर बांधकाम, आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जागेवर बांधकाम करणे, मजल्यांची मर्यादा न पाळणे आदींचा समावेश आहे. याविषयी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, गत दोन वर्षांपूर्वी अवैध बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नव्हती. आता नव्याने सर्व्हे करण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
ज्या शंभर मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश देण्यात आल्याचे पुजारी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal construction; Hundreds of cases will be filed against 100 people