शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जैस्वाल, दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार

By admin | Updated: November 2, 2014 00:23 IST

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आ. प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्यात येत असून आठ दिवसांत त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आ. प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्यात येत असून आठ दिवसांत त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. जैस्वाल, दानवे यांना संघटन बांधणीच्या कामाकडे लक्ष देण्याच्या सूचना पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिवाळी भेटीत केल्या आहेत. जैस्वालांचे पुनर्वसन कसे करणार, दानवे यांचे पक्ष अस्तित्व काय आहे, तर दाशरथे यांच्याकडेच जबाबदारी जाणार का, अशा चर्चांना सध्या पक्षात ऊत आला आहे. जिल्हाप्रमुखपदावरून उलट- सुलट चर्चा सुरू आहेत.जैस्वाल मध्य, तर दानवे हे गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढले व ते दोघेही पराभूत झाले. मात्र, या जोडीचे संघटन बांधणीत योगदान महत्त्वाचे ठरेल, असे पक्षप्रमुखांना वाटत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी दोघांनाही संघटनेचे काम करण्यासाठी सूचना केल्याचे कळते. दानवे यांना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे आदेश ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात दिले आहेत. मात्र, दानवे यांनी याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. गंगापूर मतदारसंघाच्या दौऱ्यानंतर ते जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. माजी आ. माने यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर पक्षातील वातावरण गढूळ झाले आहे. जैस्वाल, दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या दिवशी भेट घेतली. पक्षातील कुणी काम केले, कुणी गद्दारी केली, याची माहिती दोघांनीही ठाकरे यांना दिलेली आहे. विधान परिषद सदस्यपद मिळावे, अशी जैस्वाल समर्थकांची मागणी असून ठाकरे यांच्यापर्यंत ती मागणी लावून धरण्यासाठी एक गट सक्रिय झाल्याचे कळते.