शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयुपी लाभार्थ्यांना ओळखपत्र

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : बीएसयुपी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ यासाठी शहरातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़

नांदेड : बीएसयुपी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ यासाठी शहरातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ झोपडपट्टीमुक्त शहराची निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २७ हजार ९८५ घरे उभारण्यात येणार आहेत़ आतापर्यंत १५ हजारांवर घरकुले बांधली असून उर्वरित घरांचे कामे सुरू आहेत़ घरकुल परिसरातंर्गत १८ हजार ७६० मीटरपर्यंत सिमेंट रस्ता, ७ हजार ९०८ मीटर सिमेंट नाली, ७ हजार ६९९ मीटर लांबीची पाणीपुरवठा लाईन, ३७ हजार मीटरपर्यंत मलनि:सारण वाहिनी व पथदिवे लावणे आदी सुविधा देण्यात येत आहेत़ यासर्व सुविधेसोबतच लाभार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबाची व घरकुलाची माहिती संकलीत करून ओळखपत्रात संग्रहित केली जाणार आहे़ आधारकार्डच्या धर्तीवर घरकुल लाभार्थ्यांना बायोमेट्रीक कार्ड देण्यात येणार आहे़ कार्डावर घरकुलात राहणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे शिक्षण, वय, जात, धर्म, व्यवसाय ही संपूर्ण माहिती संग्रहित राहणार आहे़ ओळखपत्राच्या क्रमांकावर क्लिक केल्यास संबंधित लाभार्थ्याची माहिती तात्काळ उपलब्ध होईल़ शहरात बांधून पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे़ अपील ंसंस्थेच्या वतीने सध्या तरोडा खु़ भागातील सिद्धांतनगर, पालीनगर, तथागतनगर, बोधिसत्वनगर, याठिकाणी ओळखपत्रासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुग्रीव आंधारे यांनी दिली़ दरम्यान, तरोडा भागातील बीएसयुपी योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत़ यामध्ये रस्ते, नाल्यांची कामे प्रामुख्याने करण्यात येत आहेत़ या कामांची पाहणी गुरूवारी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता स्वामी यांनी केली़ (प्रतिनिधी)