शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला नुकसानभरपाई देण्याचा पतीला आदेश

By admin | Updated: December 18, 2015 23:50 IST

पैठण : भरधाव वेगाने मोटारसायकल चालवू नका, चुकून जरी अपघात झाला आणि त्यात पत्नी जखमी झाली तर पत्नीस नुकसानभरपाई देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.

पैठण : पत्नीसह मोटारसायकलवरून प्रवास करत असाल तर सावधान ..... भरधाव वेगाने मोटारसायकल चालवू नका, चुकून जरी अपघात झाला आणि त्यात पत्नी जखमी झाली तर पत्नीस नुकसानभरपाई देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. असा निर्णय नुकताच मोटार अपघात न्यायाधिकरणाने पैठण येथील पती-पत्नीच्या अपघातानंतर पत्नीने दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात दिला आहे. जखमी पत्नीस पती व विमा कंपनीने २,६४,००० रु. व या वरील ९% दराने होणारे व्याज नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश नुकतेच औरंगाबाद न्यायाधिकरणाने दिले आहेत. यामुळे पत्नीसह मोटारसायकलने प्रवास करत असाल तर खबरदार. भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालवू नका, हा संदेश या निमित्ताने प्रसारित झाला आहे. पैठण येथील माहेश्वरी भक्त निवासचे व्यवस्थापक असलेले श्रीराम काकडे व त्यांच्या पत्नी दयासागर काकडे हे दाम्पत्य २४ मे,२०१० रोजी माजलगाव येथून त्यांच्या मोटारसायकलने पैठणकडे येत होते. दरम्यान, गढी जवळील खांडवी फाट्याजवळ अचानक एक कुत्रे त्यांच्या मोटारसायकलसमोर आले. त्या कुत्र्याला वाचवता वाचवता श्रीराम काकडे यांच्याकडून मोटारसायकल रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडावर जाऊन धडकली. यात दोघेही जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या दयासागर काकडे यांच्यावर औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये महिनाभर उपचार करण्यात आले. त्यांना २०% अपंगत्व आले होते. उपचार घेऊन घरी आल्यानंतर आपल्या अपघातास व अपंगत्वास पती श्रीराम काकडे यांचे निष्काळजीपणाने भरधाव मोटारसायकल चालवणेच जबाबदार असल्याची धारणा दयासागर काकडे यांची झाली व त्यांनी वकील संदीप राजेभोसले यांच्या मार्फत विमा कंपनी व पती श्रीराम काकडे यांच्या विरोधात ६ लाख रुपये नुकसानभरपाईचा दावा औरंगाबाद अपघात न्यायाधिकरणात दाखल केला होता. हा दावा मान्य करत पत्नीस नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत. पतीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला असला तरी दोघे पती-पत्नी एकाच घरात राहत आहेत. गेल्या चार वर्षांपासून न्यायालयात दावा चालू असला तरी त्यांच्यात कधी कटुता आली नाही. चर्चा झाली तर फक्त कोण जिंकणार हीच होत होती, असे श्रीराम काकडे यांनी सांगितले.