शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

निळा पुनर्वसनातील ४६९ लाभार्थ्यांना घरांचे वाटप

By admin | Updated: July 8, 2017 00:06 IST

पूर्णा : पूर्णा नदीला येणाऱ्या पूर स्थितीने वारंवार प्रभावित होणाऱ्या निळा गावची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटच्या टप्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : पूर्णा नदीला येणाऱ्या पूर स्थितीने वारंवार प्रभावित होणाऱ्या निळा गावची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटच्या टप्यात आली आहे. ७ जुलै रोजी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पुनर्वसनातील ४६९ लाभार्थ्यांना घरे वाटप करण्यात आली आहेत. तालुक्यातील निळा हे गाव पूर्णा नदीच्या काठावर आहे. मागील अनेक वर्षात आलेल्या पूरस्थितीत हे गाव धोक्यात आले होते. १९६१ साली या गावातील ग्रामसभेत गावाच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. २००५ साली पुन्हा हे गाव पाण्याने वेढले गेले. यावेळी जिल्हा प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाबाबत हालचाली सुरू केल्या. २००६ मध्ये परिसरातील जमीन अधिग्रहित करून पुनर्वसनाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. कधी काम सुरू तर कधी बंद होत. अखेर यावर्षी पुनर्वसनाच्या कामाला गती मिळाली. नवीन जागेतील ५६४ घरांचे काम पूर्ण झाले असून ७ जुलै रोजी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, तहसीलदार श्याम मदनूरकर, नायब तहसीलदार वंदना मस्के यांच्या उपस्थितीत पूर्णा तहसील कार्यालयात एका कार्यक्रमाद्वारे यापैकी ४६९ लाभार्थ्यांना घर क्रमांक वाटप करण्यात आले. ताबा पत्र मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये लोकवाटा म्हणून जमा करावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निळा पुनर्वसनाचा प्रश्न मागील ५६ वर्षांपासून प्रलंबित होता. नवीन घरे मिळत असल्याने लाभार्थ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.