शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाचे घोडे अडलेलेच

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे.

औरंगाबाद : पेरणी तोंडावर येऊनही बँकांकडून शेतकऱ्यांना अतिशय संथगतीने पीककर्जाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. आतापर्यंत विभागात बँकांकडून एकूण उद्दिष्टाच्या केवळ २४ टक्के एवढेच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १५ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे.सतत चार वर्षांच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. सध्या त्याच्याकडे पेरणीसाठीही पैसे नाहीत. म्हणूनच खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकांना दिलेले आहेत. विभागातील बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही ठरवून देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियोजनानुसार मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून ९,८६३ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आलेले होते. पेरणीच्या आधी पीककर्ज मिळाले तर पेरणीचा खर्च भागविता येईल म्हणून मराठवाड्यातील शेतकरी संबंधित बँकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहेत. मात्र, बँकांकडून त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. त्याविरोधात महिनाभरात मराठवाड्यात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेही केली; परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आता मान्सून चोवीस तासांत महाराष्ट्राच्या सीमेवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मशागतीची कामे पूर्ण झाल्याने पेरणीसाठी शेतही तयार आहे. पण अजूनही (पान ५ वर)विभागात आतापर्यंत उद्दिष्टाच्या २४ टक्के इतके पीककर्ज वाटप झाले आहे. बँकांकडून कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यासाठी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. - राजेश सुरवसे, विभागीय सहनिबंधक, औरंगाबाद