शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ लेणीत मधमाशांचे तांडव! शेकडो पर्यटकांची धावपळ; ८ गंभीर जखमी, प्रशासकीय ढिसाळपणा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:15 IST

वनविभाग की पुरातत्त्व विभाग? वेरूळ लेणीतील मधमाशांचे पोळे काढण्याच्या जबाबदारीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी.

खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील कैलास लेणी (क्र. १६) आणि लेणी क्र. १० मध्ये रविवारी सकाळी १०:३० च्या सुमारास मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ८ पर्यटक गंभीर जखमी झाले असून ५० ते १०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पर्यटकांची मोठी तारांबळसलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणीत पर्यटकांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लहान मुले आणि वृद्ध पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. कोल्हापूर येथील पर्यटक राकेश देसाई यांनी तक्रार नोंदवली की, जीव वाचवून पळणाऱ्या पर्यटकांना मदत करण्याऐवजी प्रवेशद्वारावर टोकन मागून अडवणूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी नेण्याची कोणतीही सोय पुरातत्त्व विभागाने केली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे.

दोष कुणाचा? अधिकाऱ्यांमध्ये जुंपलीनागपूरचे पर्यटक सतीश देवजवार यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर मधमाशांचे पोळे काढण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, यावरून वाद सुरू झाला आहे. पुरातत्त्व विभागाने वनविभागाकडे बोट दाखवले आहे, तर वनविभागाने ही जबाबदारी पुरातत्त्व विभागाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bee Attack at Ellora Caves Injures Tourists; Chaos Ensues

Web Summary : A bee attack at Ellora Caves injured eight tourists, causing panic. Visitors criticized authorities for lack of aid and disputed responsibility for beehive removal. Injured tourists were moved to Aurangabad for further treatment.
टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन