शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सुटी संपली... शाळा भरली..!

By admin | Updated: June 16, 2015 00:51 IST

बीड : उन्हाळी सुट्यांतील धम्माल- मस्ती संपवून विद्यार्थ्यांनी सोमवारी दफ्तर पाठीवर लादत

बीड : उन्हाळी सुट्यांतील धम्माल- मस्ती संपवून विद्यार्थ्यांनी सोमवारी दफ्तर पाठीवर लादत शाळेचा रस्ता पकडला. त्यामुळे शाळांत पुन्हा मुला- मुलींचा किलबिलाट ऐकावयास मिळाला. प्रवेशोत्सवानिमित्त शनिवारीच शाळेत मुक्कामी असलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी फेऱ्या काढण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन शैक्षणिक आयुष्याचा श्रीगणेशा करणाऱ्या मुला-मुलींना शाळेत सोडण्यासाठी पालक आले होते. शाळेची ओढ व आई- वडिलांचा दुरावा अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या काही बालकांच्या डोळ्यात पाणी आले तर काही हुंदके देत होते.नवे वर्ग, नवे शिक्षक, नवे सवंगडी अशा नवलाईने विद्यार्थी हरखून गेले. पहिला दिवस उन्हाळी सुटीत केलेली मौजमजा मित्रांशी ‘शेअर’ करण्यातच गेला. शिवाय काहींनी एकमेकांचा परिचय करुन देत नवे दोस्तही बनविले.एऱ्हवी अभ्यासासाठी रागावणारे शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसून आले. काही शाळांत विद्यार्थ्यांना फुल देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. दुपारी गोडभात देण्यात आला. उत्साही व आनंददायी वातावरणातच दिवस गेला. (प्रतिनिधी)प्रवेशोत्सवानिमित्त सीईओ नामदेव ननावरे हे शनिवारी धर्मापुरी जि. प. शाळेत मुक्कामी होते. सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांची गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ननावरे यांनी फूल देऊन स्वागत केले. यावेळी पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. गावकरी उपस्थित होते.जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी विविध शाळांना सरप्राईज भेटी दिल्या. समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, जि. प. सदस्य देवीदास धस, विजय पोटे त्यांच्यासोबत होते.४पाली, मांजरसुंबा (ता. बीड), आष्टी, शेरी येथील शाळेतही ते गेले. यावेळी आरोग्य उपकेंद्रांमध्ये जाऊन त्यांनी रूग्णसेवेची पाहणी केली.४शेरी येथे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. उत्तरे न देता आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. हलगर्जी, कामचुकार शिक्षकांची गय नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ लाख ९४ हजार ८९४ विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके आली आहेत. पहिली ते पाचवी प्राथमिक शाळेतील २ लाख ४९ हजार ८१५ तर सहावी ते आठवीतील उच्च प्राथमिक शाळेतील १ लाख ४५ हजार ७९ विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिल्या दिवशी पुस्तकांचे वाटप झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांना ते जसे येतील तसे वाटप केले जाणार आहे.जिल्ह्यातील एकूण शाळांची संख्या साडेतील हजाराहून अधिक आहे. जि.प. च्या २ हजार ५१६ इतक्या प्राथमिक तर ५६ माध्यमिक शाळा आहेत. खासगी अनुदानीत प्राथमिक शाळा १४८ व खासगी माध्यमिक शाळांचा आकडा ६१० इतका आहे. खासगी कायम विनाअनुदानीत १३० शाळांचाही समावेश आहे. याशिवाय ५०० हून अधिक खासगी विनाअनुदानीत इंग्रजी शाळा देखील आहेत.