शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापन कार्यक्रमासाठी हिंगोली आगारात तयारी

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

हिंगोली : एसटी महामंडळ रविवारी ६५ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना पहिल्यांदाच राज्यभर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.

हिंगोली : एसटी महामंडळ रविवारी ६५ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना पहिल्यांदाच राज्यभर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने हिंगोली आगारानेदेखील पहिल्यांदाच होणार्‍या या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. त्यात उत्कृष्ट कामाबद्दल १५ कर्मचार्‍यांचा सत्कार तसेच चांगल्या कामासाठी सर्व कर्मचारी शपथ घेणार आहेत. १९४८ साली ३५ बसेसच्या ताफ्यासह ‘बॉम्बे रोड ट्रान्सपोर्ट’ची स्थापना झाली होती. त्यावर्षीच अहमदनगर ते पुणे दरम्यान पहिली बस धावली होती. कालांतराने बॉम्बे ट्रान्सपोर्टने ‘राज्य परिवहन महामंडळ’ हे नाव धारण केले. रविवारी हे महामंडळ ६५ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्यामुळे राज्यभर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. पहिल्यांदाच होणारा हा कार्यक्रम प्रत्येक बसस्थानक तसेच आगारात साजरा केला जाणार आहे. स्वतंत्र जिल्हा निर्मितीनंतर हिंगोली आगाराने बरीच प्रगती केली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा १४ लाख रूपयांनी आगाराचे उत्पन्न वाढले आहे. गतवर्षी १ कोटी ७७ लाखावरून यंदा १ कोटी ९१ लाखांवर उत्पन्न गेले आहे. आजघडीला ५८ बसेस प्रतिदिवशी २२ हजार किलोमीटर धावतात. त्यातून दररोज ६ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. त्यासाठी एकूण ३०२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ११९ चालक ११७ वाहक आणि ३२ प्रशासकीय कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दिवसरात्र काम करणार्‍या या कर्मचार्‍यांतील उत्कृष्ट कार्याबद्दल १५ कर्मचार्‍यांचा सत्कार रविवारी करण्यात येणार आहे. त्यात अनुक्रमे ५ वाहक, चालक आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दोन आंतरराज्यीय, ८ लांब पल्ल्याच्या आणि २ मध्यम पल्ल्यांच्या गाड्यांवर या कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. भविष्यात पारदर्शकता ठेवून कर्तव्यनिष्ठेने कार्य करण्यासाठी रविवारी आगारातील कर्मचारी शपथ घेणार आहेत. शिवाय आगाराची स्वच्छता आणि आत्मियता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून आगारात मंगलमय ध्वनी वाजविल्या जाणार आहे. आगारात रांगोळ्या काढल्या जाणार असून केळीचे खांब रोवून पूजा केली जाणार आहे. शनिवारी दुपारपासून पताके लावण्यास सुरूवात करण्यात आली. कर्मचार्‍यांबरोबर प्रवाशांना कार्यक्रमात समावून घेण्यासाठी ५० जणांना गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच १० किलो साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)