शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने मागविला अहवाल

By admin | Updated: June 27, 2014 00:09 IST

बीड: आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात सेवाज्येष्ठता डावलून सहशिक्षकास पर्यवेक्षकपदी पदोन्नती दिली होती़

बीड: आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात सेवाज्येष्ठता डावलून सहशिक्षकास पर्यवेक्षकपदी पदोन्नती दिली होती़ त्यानंतर शिक्षकाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते़ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमबाह्य पदोन्नतीचा अहवाल मागविला आहे़कडा येथे अमोलक जैन विद्या प्रसारक संस्थेचे मोतीलाल कोठारी विद्यालय आहे़ या विद्यालयात दीड वर्षांपूर्वी सहशिक्षक बी़ टी़ जगताप यांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती बहाल करण्यात आली़ सेवाज्येष्ठतेनुसार सहशिक्षक अशोक गोल्हार यांना पदोन्नती मिळायला हवी होती़ त्यानंतर शिक्षक गोल्हार यांनी शिक्षण विभागाकडे दाद मागितली़ न्याय न मिळाल्याने त्यांनी उपसंचालकांकडे तक्रार नोंदविली़ उपसंचालकांनी २२ जुलै २०१३ रोजी अंतिम सुनावणी घेऊन गोल्हार यांची बाजू मान्य केली़त्यानंतर १२ आॅगस्ट २०१३ रोजी गोल्हार यांनी नियमबाह्य पदोन्नती देणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी उपसंचालकांकडे केली; पण कारवाई काही झालीच नाही़ त्यानंतर गोल्हार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले़ त्यांनी तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे, एम़ के़ देशमुख, संस्थाचालक कांतीलाल चानोदिया,मुख्याध्यापक एस़ बी़ गायकवाड, लिपीक के़पी़ मुथ्था, डी़ डी़ सरोदे, शिक्षक बी़ टी़ जगताप व जि़प़ शिक्षण विभागातील लिपीकांवर कारवाईची मागणी केली़ १० जून रोजी एस़ एस़ शिंदे, एआयएस चिम्मा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी तीन महिन्यात चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले़ गोल्हार यांच्या वतीने अ‍ॅड़ सचिन देशमुख यांनी काम पाहिले़याबाबत तत्कालीन (मा़) शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे म्हणाले, संस्थेने जगताप यांच्या नावाची शिफारस केली होती़ संस्थेचा तो अंतर्गत विषय होता़ त्यात शिक्षण विभागाला नाहक गोवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी ‘लोकमत’कडे केला. (प्रतिनिधी)पदोन्नती आदेशही बनावट२४ जानेवारी २०१३ रोजी अशोक गोल्हार यांना डावलून बी़ टी़ जगताप यांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती दिली़ या आदेशाचे मूळ दस्ताऐवज जि़प़ च्या माध्यमिक शिक्षण विभागात नाहीत़ त्यामुळे पदोन्नती आदेश बनावट असल्याचे मत उपसंचालकांनी नोंदविलेले आहे़ बनावट पदोन्नती आदेश देणारे रॅकेट कार्यरत असल्याचे यावरुन सिद्ध झाले़ मात्र, जि़प़ ने अद्याप कारवाई निश्चित केलेली नाही़