शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

मराठवाड्यातील तीनशे मंडळांत दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:59 PM

मराठवाड्यातील ४२१ पैकी ३०० मंडळांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे

ठळक मुद्दे१२ जूनपर्यंत मराठवाड्यातील ५० टक्के भागात पावसाने हजेरी लावली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ३०० मंडळांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर १२१ मंडळांमध्ये आजवर फक्त पावसाची हजेरी लागली आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील बहुतांश सर्व मंडळांमध्ये १०० टक्क्यांच्या आसपास पाऊ स झाला आहे. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. ७ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची तारीख असते. १२ जूनपर्यंत मराठवाड्यातील ५० टक्के भागात पावसाने हजेरी लावली आहे. 

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. परिणामी मराठवाड्यातील ५० टक्के भागाला १ हजारहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. १६ लाखांपर्यंतची लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जून अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास टँकरची संख्या १ हजारांच्या आसपास कायम राहण्याची महसूल विभागाने वर्तविली आहे. 

७ जूननंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या उन्हाळ्यातही पुरेसा पाऊस झाला नाही. यंदाही पावसाची सुरुवात हलक्या रूपाने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. औरंगाबादमधील ११ मंडळांत १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालन्यातील २४, परभणीतील ३९, हिंगोलीतील २८, नांदेडमधील ७४, बीडमधील ३३, लातूरमधील ५२, उस्मानाबादमधील  ३९ मंडळांत पावसाने हजेरी लावली आहे. 

जिल्हा    एकूण मंडळ    १००%  पावसाची मंडळेऔरंगाबाद         ६५            ११जालना             ४९            २४परभणी            ३९            ३९हिंगोली            ३०            २८नांदेड               ८०            ७४बीड                 ६३            ३३लातूर              ५३            ५२उस्मानाबाद    ४२            ३९एकूण             ४२१            ३००

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी