शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात जोरदार पाऊस

By admin | Updated: June 13, 2015 23:50 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. शहरात सायंकाळी झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून नागरिकांची मोठी त्रेधातिरपट उडाली होती.

जालना : शहरासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. शहरात सायंकाळी झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून नागरिकांची मोठी त्रेधातिरपट उडाली होती. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण १५.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ७५.८७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी झालेला तालुकानिहाय पाऊस (कंसात एकूण पावसाची आकडेवारी) : जालना - १.६३ (६७.३९), भोकरदन ४६.०० (८२.७७), जाफराबाद १४.४० (६३.०८), बदनापूर ५.८० (७५.०८), परतूर २८ (९९.०४), अंबड १.०० (५६.७), घनसावंगी १८.१४ (५५.९९), मंठा ८.५० (१०५.१). जिल्ह्यात शनिवारी भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले होते. आतापर्यंत मंठा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद असून या परिसरातील नदी, नाल्यांनाही पूर आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषत: जलयुक्त अभियानाअंतर्गत ज्या नाल्यांमध्ये पाणी आले किंवा ज्या तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला, तेथील शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. जालना शहरात दुपारी ४ नंतर पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे बाजारपेठेतील खरेदीवरही परिणाम दिसून आला. सायंकाळी विविध रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील कुंडलिका नदीला चांगले पाणी आले असून शहर व परिसरातील बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयामध्ये गेल्या चार दिवसातील पावसामुळे पाणीपातळीत अडीच फुटांनी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)४ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव शेर मुलकी येथील रहिवासी किशन बंडू साळवे यांचा पिंपळगाव नदीच्या पुराचे पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना १२ जून रोजी घडली. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक बाबासाहेब तुपे हे करीत आहेत.