शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला मिळेल प्रवेश

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

औरंगाबाद : वय ६ ते १४ वर्षे वयोगटातील कोणताही बालक शाळेपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात मागेल त्याला प्रवेश दिला जाईल.

 औरंगाबाद : वय ६ ते १४ वर्षे वयोगटातील कोणताही बालक शाळेपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात मागेल त्याला प्रवेश दिला जाईल. त्यासाठी शाळांमधून जागाही भरपूर असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, या कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळांना प्रवेश नाकारता येणार नाही. शैक्षणिक वर्षात केव्हाही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. दि.१६ जून २०१४ रोजी शाळा सुरू होणार असून, नव्या शैक्षणिक सत्रास प्रारंभ होईल. शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी प्रवेश सुरू करावा. पालकांनी काही निवडक शाळांचा आग्रह धरू नये, असे सांगून देशमुख म्हणाले, जिल्ह्यात ३,८९३ शाळा असूनही पालकांची ओढ फक्त निवडक ३० ते ३५ शाळांकडे असते, त्यामुळे प्रवेशाच्या अडचणी निर्माण होतात. तरीही प्रवेशासंदर्भात अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पाचवीचे ७७७, आठवीचे ३२६ वर्ग शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्ग जोडण्यात येत असून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना पाचवीचे ७७७ आणि आठवीचे ३२६ वर्ग सुरू करण्याची परवानगी शिक्षण आयुक्तांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेला दिली आहे. आरटीईनुसार पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत आणि सहावी ते आठव्या इयत्तेतील मुलांना तीन किलोमीटर परिघाच्या आत शाळा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा संख्या व व्यवस्थापन शासकीय व स्वायत्त संस्था 2,238 खासगी अनुदानित 747 विनाअनुदानित 908 मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीची विद्यार्थी संख्या - ८ लाख ४९ हजार १५६ (इयत्ता पहिली ते बारावी) मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या- ६ लाख ६६ हजार ५६१ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी संख्या -९१ हजार ४७९ उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्या -८७ हजार १५२ हिंदी माध्यमातील विद्यार्थी संख्या -३ हजार ९६४ जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची संख्या -२६ हजार ४५६