शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीतून सात घरे फोडली; हजारोंचा माल पळविला

By admin | Updated: May 24, 2014 01:33 IST

बीड: शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कुलच्या समोरच्या परिसरातील दोन बिल्डींगमधील सहा घरे व त्यापासून जवळच असलेले एक घर चोरट्यांनी साफ करत हजारो

बीड: शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कुलच्या समोरच्या परिसरातील दोन बिल्डींगमधील सहा घरे व त्यापासून जवळच असलेले एक घर चोरट्यांनी साफ करत हजारो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी गावाला गेलेल्या लोकांच्या घरातच चोरी केली. त्यामुळे चोरट्यांनी नजर ठेवून ही घरे फोडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील गुरुकुल नगर भागात जवळपास दहा ते बारा चोरटे शुक्रवारी रात्री दोन ते तिनच्या सुमारास दाखल झाले. एका बिल्डिंगमधील तिन घरात घुसले. या बिल्डींगमधील नागरिक परगावी गेले असल्याने या घरांमध्ये कोणीच नव्हते. चोरट्यांनी गेटचे कुलूप मोठ्या शिताफीने तोडून बिल्डींगमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब खरसाडे यांच्या घरात जाऊन अलमारीतील चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर वरच्या मजल्यावर असलेल्या बनसोडे यांच्या घरात घुसून असाच चोरीचा प्रयत्न झाला. तसेच त्याच बिल्डिंगमधील नेवडे यांच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या घरात जाऊन आलमारी फोडली. त्यांना कपाटातील लॉकर तोडता आले नाही. त्यामध्ये जवळपास दहा तोळे सोने होते. त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या लाखे यांच्या बिल्डींगमध्ये भिंतीवर उड्यामारुन प्रवेश केला. प्रथम त्यांनी सपकाळ यांच्या घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले नगद पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर दुसर्‍या मजल्यावर असलेल्या तात्याराव पवार यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोने दागिने असा एकूण अडीज तोळ्याचे दागिने चोरले अंदाजे ५५ हजार रुपयांचे दागिने चोरले. त्र्यंबक लाखे यांच्या घरात चोरट्यांना काही मिळून आले नसल्याने तेथून ते पसार झाले. चोरी झाली असल्यची बाब काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची खबर दिली. त्यावेळी गया नगर येथील नागरिक गुरुकूल नगर येथे आले असता चोरट्यांनी गया नगर येथील चौधरी यांच्या घरात चोरी केली. शुक्रवारी सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरिक्षक सी.डी. शेवगण, दरोडा प्रतिबंधक पथकाचे भारत राऊत यांनी घटनास्थळास भेट दिली. एकाच रात्रीतून सात घरे फोडण्यात आली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी सहा पैकी एकाने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर ज्योतीराम पवार यांच्या फिर्यावदीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि चव्हाण करीत आहेत. गस्त घालणारे पोलिस फिरकतच नाहीत गुरुकुल नगरचा भाग शिवाजी नगर पोलिसांच्या हद्दीत येतो. या भागात आता पर्यंत केव्हांच पोलिस पेट्रोलिंगची गाडी येत नाही. गस्त घालणार्‍या पोलिसांची गाडी गया नगर मार्गे येते आणि जाते. गुरुकुल नगर पसिरात पोलिस येत नसल्याने चोरीट्यांना घरे फोडण्यास संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी या भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. परिसरात असतो कायम अंधार गुरुकुल नगर हा भाग नगर परिषद भागात समाविष्ठ झाला आहे. या भागात अनेक नागरी सुविधांचा आभाव आहे. त्यातील विशेषबाब म्हणजे, गुरुकुल नगर भागात प्रत्येक खांबावर लाईट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरात भिती दायक वातावरण पहावयास मिळते. गुरुकुल नगर भागात मास्क हेड बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)